कोरोना व्हायरसचा प्रसार भारतात झपाट्याने होत आहे. कोरोनामुळे होत असलेल्या मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. घशातील वेदना, घशात खवखवणं ही कोरोनाची लक्षणं आहेत. तुम्हालाही अशी समस्या जाणवत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. सध्या पावसाळ्याचं वातावरण असल्यामुळे घसा खवखवणं, सर्दी, खोकला यांसारख्या समस्या उद्भवतात. घरच्याघरी वापरात असलेल्या पदार्थांचा वापर करून तुम्ही आजारांपासून स्वतःला लांब ठेवू शकता. मध, गरम पाणी, आलं या पदार्थांना आयुर्वेदात खूप महत्व आहे. औषधी गुणधर्म असल्यामुळे आजारांशी लढण्यास मदत होते.
असा करा तयार
एक आल्याचा तुकडा घ्या. पाण्याने स्वच्छ धुवून लहान लहान तुकड्यांमध्ये कापून घ्या. उकळत्या पाण्यात आल्याचा तुकडा घाला. पाणी अर्धे होईपर्यंत उकळून घ्या नंतर गॅस बंद करा आणि एका भांड्यात हे पाणी गाळून घ्या. या पाण्याचे सेवन करण्यासोबत गुळण्याही तुम्ही करू शकता. त्यामुळे घसा खवखवण्याची समस्या लवकरात लवकर दूर होईल.
एक ग्लास पाण्यात ४ ते ५ काळी मिरी, दालचीनी, लवंग, हळद, वेलची आणि तुळशीची पानं उकळून घ्या. त्यानंतर शेवटी आवडत असल्यास गुळ घाला. १५ मिनिटं हा काढा उकळल्यानंतर गॅस बंद करा आणि या काढ्याचे सेवन करा. रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्यानंतर या काढयाचे सेवन करा. घसा खवखवल्यानंतर गरम पाण्याच्या गुळण्या करा.
घश्यात कफ जमा होण्याची समस्या अनेक वर्षांपर्यंत असेल तर कानाच्या नर्व्समध्ये मॉईश्चर जमा होते. त्यामुळेच नर्व्सला फंगस निर्माण होऊ शकतो. त्यानंतर पिडित व्यक्तीने काहीही खाल्यास कानांमध्ये खाज यायला सुरूवात होते. ही खाज इतक्या तीव्रतेने येते की व्यक्तीला अस्वस्थ झाल्याप्रमाणे वाटते.
कानात आणि घशात सतत खाज येत असलेल्या लोकांना चहा किंवा गरम पाणी, सुप प्यायल्यामुळे आराम मिळू शकतो. कारण यामुळे कान आणि घश्यातील नर्व्स शेकले जातात. जर तुम्हाला खाज येण्याचा त्रास जास्त उद्भवत असेल तर सगळ्यात आधी थंड पदार्थांचे सेवन बंद करा. तसंच आंबट पदार्थही खाऊ नका. नाकातील हाडामुळे खाज येण्याची समस्या उद्भवते. अनेकदा अनुवांशिकतेने या समस्येचा सामना करावा लागतो.
या समस्येवर उपाय म्हणून आईस्क्रिम, थंड पाणी असे थंड पदार्थ खाऊ नका. नाकातील हाडाच्या समस्येवर डॉक्टरांकडून योग्य ती ट्रीटमेंट घ्या. योग्य ट्रिटमेंट आणि औषध घेतल्यास ही समस्या कमी करता येऊ शकते. गंभीर स्थितीत सर्जरी सुद्धा करावी लागते. जर तुम्हाला सर्जरी करायची नसेल तर त्यासाठी औषध घेऊन ही समस्या नियंत्रणात ठेवा. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवून तुम्ही या समस्येपासून लांब राहू शकता.
ज्या व्यक्तीला भेटलात तीच व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आल्यास; संक्रमणापासून कसा कराल बचाव?
Coronavirus : ६ प्रकारच्या कोरोना व्हायरस आजाराची माहिती आली समोर, वाचा कोणता किती घातक?