सध्या कोरोनाच्या माहामारीमुळे संपूर्ण जगभरात हाहाकार निर्माण झाला आहे. कोरोनापासून लोकांचा बचाव करण्यासाठी सर्वत्र प्रयत्न केले जात आहे. शास्त्रज्ञ कोरोनाची लस शोधण्यााठी प्रयत्न करत आहेत. सध्याच्या स्थितीत कोणतंही औषध किंवा लस उपलब्ध नसताना गंभीर आजारांसाठी वापरात असलेल्या गोळ्यांचा आणि औषधांचा प्रयोग करून कोरोना रुग्णावर उपचार केले जात आहेत. एका आयुर्वेदिक औषधाचे नाव सुद्धा चर्चेत आहे ते म्हणजे फिफाट्रोल. मानवी शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी या औषधाचा वापर केला जातो.
अनुसंधान विकास निगम 'कॉम्पेंडियम ऑफ इंडियन टेक्नॉलॉजी फॉर कॉम्बिंग कोविड-19 मार्फत या औषधाला विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. संक्रमणाशी लढत असलेल्या औषधांमध्ये फिफाट्रॉलचा समावेश आहे. या औषधाबाबत आज आम्ही तुम्हाला अधिक माहिती सांगणार आहोत.
आरोग्य तज्ञांच्यामते या औषधामुळे शरीरातील रोपगप्रतिकारकशक्ती वाढते. कोरोना व्हायरसचा प्रभाव कमी करण्याासाठी हे औषध फायदेशीर ठरेल. तसंच कोरोनाचं संक्रमण झालेले लोक या आजारापासून लवकरात लवकर बरे होऊ शकतात. फिफाट्रोल या औषधात वेगवेगळ्या आयुर्वेदिक औषधाचे मिश्रण आहे. औषधीय गुणांनुसार घसा खवखवत असल्यास, अंगदुखीचा त्रास होत असल्यास, नाक बंद होणं, डोकेदुखी अशा समस्यांपासून या औषधामुळे तात्काळ आराम मिळतो. तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार नैसर्गिक एंटीबायोटीकच्या स्वरुपात हे औषध काम करतं.
एमिल फार्मामार्फत तयार करण्यात आलेले फिफाट्रोल हे गुडुची, चिरयता, करंजा, कुटकी, तुळस, संजीवनी घनवती, दारुहरिद्रा, अपामार्ग, गोदंती (भस्म), मृत्युंजय रस, संजीवनी वटी यांसारख्या आरोग्यवर्धक वनस्पतींपासून तयार केले आहे. त्यामुळे व्हायरल आणि बॅक्टेरिअल किंवा इतर संक्रमणांना रोखता येऊ शकतं. या औषधाने शरीराचं वाढलेले तापमान कमी होण्यास मदत होते. संक्रमीत रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होते.
(CoronaVirus News : धुम्रपानामुळे कोरोना विषाणूंपासून बचाव होतो? जाणून घ्या फॅक्ट्स)
(कोरोना विषाणूंचा धोका 'या' गोष्टीमुळे ८० टक्क्यांनी होईल कमी, तज्ज्ञांचा खुलासा)