जगभरासह भारतातही कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. कोरोना व्हायरसची लागण झाल्यामुळे जगभरातून दोन लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाला नष्ट करण्यासाठी तसंच कोरोनाची लागण होण्यापासून लोकांना वाचवण्यासाठी सर्वच देशातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. कारण दिवसेंदिवस कोरोनाचा धोका वाढत चालला आहे. दरम्यान न्युयॉर्कमधील शास्ज्ञांनी कोरोनाला नष्ट करण्याबाबत एक दावा केला आहे.
हवेतून प्रसार झाल्यामुळे कोरोनाचा धोका अधिक वाढू शकतो. न्यूयॉर्कच्या कोलंबिया युनिव्हरर्सिटीचे संशोधक अल्ट्रावॉयलेट लाइट वर काम करत आहेत. यामुळे रुग्णालयं, शाळा, एयरपोर्ट, रेल्वे स्टेशनच निर्जंतुकीकरण केलं जात आहे. युनिव्हरसिटीच्या सेंटर ऑफ रिसर्च स्कूलचे डॉ. डेविड बर्नर यांनी दिलेल्या माहितीनुसार युव्हीलाईट्सचा वापर प्रयोग शाळा, रुग्णालयतील संशोधन कक्षातील परिसर यांच्या साफ-सफाईसाठी केला जातो.
युव्ही लाईट्समुळे मायक्रोब्सला नष्ट करता येऊ शकतं. त्यामुळे कोणताही धोका निर्माण होत नाही. तसंच डॉक्टर बर्नर यांनी सांगितलं की, ९० टक्के व्हायरस युव्हीसी लाईट्सच्या डोसमुळे मारला गेला आहे. त्यामुळे त्वचेला कोणतंही नुकसान होत नाही. सार्वजनिक स्थळांवर युव्ही लाईटचा वापर नुकसानकारक ठरत नाही. ( हे पण वाचा-रोजच्या डासांनी हैराण असाल, तर 'या' उपायांनी त्वचेचं होणारं नुकसान टाळा)
देशासह जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊनचा कालावधी संपायला आल्यामुळे सुरक्षेबाबत काळजी घ्यायला हवी. व्हायरसला नष्ट करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी युव्ही लाईटचा वापर करायला हवा. स्वच्छता ठेवायला हवी. अन्यथा व्हायरसचं पुन्हा तितक्याच वेगाने आक्रमण होण्याची शक्यता आहे. असं मत तज्ञांनी व्यक्त केलं आहे. ( हे पण वाचा-दात घासताना जीभही करा स्वच्छ; अन्यथा शरीराचं होईल मोठं नुकसान)