कोरोना विषाणूंबाबत लोकांच्या मनात भीतीचं वातावरण आहे. सध्या कोरोना रुग्णांबाबत एक धक्कदायक माहिती समोर आली आहे. कोरोनातून बाहेर आल्यानंतर रुग्णांना सेप्सिस हा आजार होण्याचा जास्त धोका असतो. ब्रिटेनच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार सेप्सिस या आजाराचा धोका लक्षात घेता सरकराने सर्वसामान्य लोकांना सुचना देत सुरूवातीच्या काळातच हा आजार ओळखण्याचे आवाहन केले आहे.
सेप्सिस या आजारात इम्यून सिस्टीम जास्त प्रमाणात कार्यान्वित होते. त्यामुळे रुग्णांचे अवयव अकार्यक्षम होतात. गंभीर स्थितीत मृत्यू होण्याचीही शक्यता असते. कोरोना विषाणूंमुळे रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत होते. त्यामुळे भविष्काळात उद्भवत असलेल्या शारीरिक समस्यांची सामना करणं कठीण होतं. द सन च्या रिपोर्टनुसार यूके सेप्सिस ट्रस्ट (UKST) ने कोरोनातून बाहेर येत असलेल्या लोकांना सेप्सिसच्या लक्षणांबाबत माहिती करून घेण्यासाठी आवाहन केलं आहे. तसंच सुरूवातीच्या काळात लक्षणं दिसल्या डॉक्टरांशी संपर्क करण्याचे ही सांगितले आहे.
सन सेप्सिस ट्रस्टच्या रिपोर्टनुसार कोरोनामुळे रुग्णालयात भरती असलेल्या पाचपैकी एका रुग्णाला सेप्सिसची समस्या होती. UKST ने दिलेल्या माहितीनुसार ब्रिटेनमध्ये जवळपास एक लाक लोकांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. यातील एकूण २० हजार लोकांना सेप्सिसची समस्या उद्भवली आहे. यूके सेप्सिस ट्रस्ट ने सरकारकडून लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी कॅम्पेन सुरू करण्याचे आवाहन केले आहे. डॉ. रॉन डेनियल्स यांनी सांगितले की सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांनही सेप्सिसचा धोका असू शकतो.
सेप्सिसच्या लक्षणांमध्ये अडखळत बोलणं, संभ्रमावस्थेत असणं, मासपेशीतील वेदना, सांधेदुखी, श्वास घ्यायला त्रास होणं, त्वचेचा रंग बदलणं अशा समस्यांचा समावेश आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार सुरूवातीला ही लक्षणं दिसून आल्यास वेळीच लक्ष दिले तर योग्य उपचार करता येऊ शकतात.
CoronaVirus News : रुग्णालयात बेड मिळाला नाही, म्हणून रुग्णानं उभारलं रुग्णालय अन्...
'या' सवयीमुळे वाढत आहे कोरोनाचा संसर्गाचा धोका; आरोग्य मंत्रालयाची माहिती