कोरोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण तयार झालं आहे. जगभरातील कोरोना व्हायरसची लागण होऊन मृत्यू झालेल्याची संख्या २ लाख ८० हजारांपेक्षा जास्त झाली आहे. सर्वच देशातील शास्त्रज्ञ कोरोनावर औषधं शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत.संशोधन सुरू असताना कोरोनाच्या प्रसाराबाबात वेगवेगळी माहिती समोर यायला सुरूवात झाली आहे. अलिकडे करण्यात आलेल्या संशोधनानुसार खोकल्याच्या औषधांमुळे कोरोना व्हायरस पसरण्याचा धोका जास्त असतो.
सायन्स मॅगजीनमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका रिपोर्टनुसार कफ सिरप म्हणजेच काही खोकल्याच्या औषधांच्या सेवनाने कोरोना विषाणूंचं संक्रमण वाढू शकतं. अशा स्थितीत खोकल्यानेग्रस्त असलेले कोरोना रुग्णांसाठी हा शोध चिंता वाढवणारा ठरला आहे. शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की, खोकल्याच्या औषधांवर चाचणी करण्यात आली तेव्हा कफ सिरपमध्ये असलेल्या केमिकल्समुळे कोरोनाचं संक्रमण जास्त वाढत असल्याचं दिसून आलं.
हा शोध कॅलिफोर्नीयाची युनिव्हसिटीमधील सॅन-फ्रांसिस्को स्कूल ऑफ फॉर्मेसीमध्ये करण्यात आला आहे. या विषयावर संशोधन करत असलेल्या ब्रायन सोईसेट यांनी सांगितले की कफ सिरप रुग्णाची खोकल्याची समस्या दूर करण्यासाठी वापरलं जातं. पण त्यात असलेले डेक्सट्रोमिथोर्फन केमिकल कोरोना व्हायरसने संक्रमित असेलेल्या रुग्णांसाठी जीवघेणं ठरू शकतं. कारण यातील केमिकल्समुळे कोरोना व्हायरस शरीरात जलद गतीने पसरतो.
संशोधकांनी सांगितल्याप्रमाणे सामान्य रुग्णाला कफ सिरपच्या सेवनाने कोणताही धोका नाही. पण जे लोक कोरोना व्हायरसने संक्रमित आहेत. त्यांनी कफ सिरपचं सेवन करणं सोडायला हवं. हा प्रयोग सगळ्यात आधी माकडांवर करण्यात आला होता. माणसांवर सुद्धा याचा वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. ब्रायन आणि त्यांची टीम आंतराराष्ट्रीय स्तरांवर कोरोना व्हायरसमध्ये असणारे प्रोटीन्स आणि माणसांमध्ये असलेले प्रोटिन्स याबाबत संशोधन करत आहेत. (हे पण वाचा-CoronaVirus News : कोरोना विषाणू फुफ्फुसांपर्यंत पोहोचू नये; यासाठी प्रभावी ठरेल 'ही' थेरेपी)
खोकल्याच्या औषधाने का पसरतो कोरोना
संशोधक ब्रायन त्यांनी दिलेल्या माहितीनुसार माणसांच्या फुफ्फुसांमध्ये दिसून येत असलेल्या नसांमधून मोठ्या प्रमाणावर प्रोटीन्स येत असतात. हे प्रोटीन्स व्हायरसला आकर्षित करतात. याचप्रमाणे मंकी सेल्समध्ये असाच प्रकार दिसून येतो. संशोधकांनी सेल्समधून निघत असलेल्या प्रोटीन्समध्ये व्हायरस टाकल्यानंतर व्हायरसची वाढ वेगाने व्हायरला सुरूवात झाली. कोरोना व्हायरसचा प्रसार थांबवण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ प्रयत्न करताना दिसून येत आहेत.