कोरोनाच्या म्युटेशनने तयार होत असलेल्या नवीन व्हायरसने आता संपूर्ण जगभरात कहर केला आहे. अमेरिकेतील टेक्सासच्या एका रुग्णालयात दाखल झालेल्या ५ हजार कोरोना रुग्णांवर करण्यात आलेल्या एका परिक्षणादरम्यान दिसून आले की, जवळपास ९९.९ टक्के केसेस कोरोनाचे रुप बदलल्यामुळे दिसून आल्या आहेत. म्हणजेच D614G व्हायरसचं हे रूप यासाठी जबाबदार आहे. कोरोना व्हायरसचं नवीन रूप मूळ व्हायरसच्या रुपापेक्षा जास्त संक्रामक आणि भयंकर असल्याचे सांगितले जात आहे. या रिसर्चसाठी तज्ज्ञांनी जवळपास ५ हजार रुग्णांमधील कोरोना व्हायरसच्या स्ट्रेनचे विश्लेषण केले होते. सगळ्यात आधी युरोपात कोरोना व्हायरसचा D614G स्ट्रेन पसरण्याची माहिती समोर आली होती.
पहिल्यांदा फेब्रुवारी महिन्यात कोरोना व्हायरसच्या D614G स्ट्रेनबाबत माहिती मिळाली होती. नंतर हा स्ट्रेन अमेरिका आणि इतर आशियाई देशांमध्ये काही आठवड्यातच पसरला. वैज्ञानिक आता SARS-CoV-2 चे हे रूप मोठ्या प्रमाणात वेगाने पसरत आहे का, याचा शोध घेत आहेत. माहामारीच्या सुरूवातीच्या दिवसात D strain व्हायरसमुळे जास्तीत जास्त लोकांना संक्रमणाचा सामना करावा लागला होता.
मार्चपर्यंत D614G स्ट्रेन जगाच्या वेगवेगळ्या भागात पोहोचला होता. एकूण संक्रमणाच्या एक चतृर्थांश रुग्णांच्या संक्रमणासाठी हा स्ट्रेन कारणीभूत होता. मे महिन्यापर्यत D614G स्ट्रेन असलेल्या रुग्णांची संख्या ७० टक्के होती. आता जगभरात एकूण कोरोना रुग्णांपैकी ८५ टक्क्यांपेक्षा अधिक रुगण D614G स्ट्रेनमुळे संक्रमित झाल्याचे सांगितले जात आहे. ऑगस्टमध्ये सिंगापूर नॅशनल युविव्हर्सिटीचे सिनिअर कंसलटंट पॉल तांबयाह यांनी सांगितले की, ''D614G स्ट्रेन अधिक संक्रामक आहे. पण मूळ व्हायरसच्या तुलनेत कमी जीवघेणा आहे.''
कोरोनाकाळात थंडीच्या वातावरणात कसे राहाल निरोगी? जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेल्या ८ टिप्स
दरम्यान देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 82 लाखांचा टप्पा पार केला आहे. मात्र असं असताना याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत घट झालेली पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 38,310 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 490 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 82,67,623 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे देशात एक लाखाहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
खुशखबर! जर्मन कंपनीच्या कोरोना लसीनं केली कमाल; मानवी चाचणीदरम्यान 'अशी' ठरली प्रभावी
देशातील कोरोना प्रादुर्भावाचा वेग कमी होताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी (3 नोव्हेंबर) दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 38,310 नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 1,23,097 पोहोचला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी सध्या 5,41,405 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर तब्बल 76,03,121 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोनावर मात केलल्या रुग्णांच्या संख्येतही मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. देशभरात 76 लाखांहून अधिक लोकांनी व्हायरसवर मात करून कोरोना विरोधातील लढाई जिंकली आहे. मेड इन इंडिया' लस कधी लॉन्च होणार? भारत बायोटेक सांगितला कोरोना लसीचा 'हा' प्लॅन