कोरोना व्हायरसनं पुन्हा एकदा हात पाय पसरायला सुरूवात केली आहे. फ्रांसमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन समोर आला अूसन त्या ठिकाणच्या आरोग्य मंत्र्यांनी सोमवारी कोरोनाचा नवा स्ट्रेन पसरल्याची माहिती दिली. सुरूवातीच्या विश्लेषणातून दिसून आलं की, कोरोनाचा नवा स्ट्रेन आधीच्या स्ट्रेनच्या तुलनेत जास्त संक्रामक असून गंभीर स्वरूपाचं संक्रमण या व्हायरसच्या माध्यमातून पसरू शकतं. लानियन रुग्णालयात कोरोनाचा हा नवा स्ट्रेन आढळला आहे.
फ्रासच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले की, ''कोरोना व्हायरसने बाधित असलेल्या रुग्णांची संख्या मागच्या २४ तासात कमालीची वाढली असून एका दिवसात ४ हजारांपेक्षा जास्त रुग्ण सापडले आहेत. २०२० मधील एकाच दिवशी सगळ्यात जास्त रुग्णांची संख्या समोर आली आहे.''
आरोग्य मंत्रालयाच्या जियोडेस वेबसाईटवर रविवारी रुग्णालयात ३३३ कोरोना व्हायरसने मृत्यू झालेल्या रुग्णांबाबत सुचना दिली आहे. फ्रांसमध्ये आतापर्यंत ९०, ७६२ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या आठवड्याच्याच्या तुलनेतच या आढवड्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली असून राजधानीच्या भागात कमी ताण येण्यासाठी रुग्णांना इतर ठिकाणी हलवलं जात आहे.
आरोग्य मंत्रालयानं सोमवारी ६ हजार ४७१ नवीन कोरोना रुग्णांची संख्या नमूद केली आहे. संक्रमण रोखण्यासाठी फ्रान्स सरकारकडून लसीकरण प्रक्रिया वेगानं केली जात आहे. ज्यांनी लसीचा एकही डोस घेतला नाही अशी रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडल्यानंतर आता अधिक सावधगिरी बाळगली जात आहे.
कोरोनाची लस घेऊनही चाचणी पॉझिटिव्ह का आणि कशी येते
कोरोनाची लस साधारणपणे १० ते १२ महिन्यात तयार केली. कोणत्याही लस निर्मितीसाठी जवळपास चार ते पाच वर्ष लागतात. कोरोनाची लस तयार करण्यासाठी फारसा वेळ हातात नव्हता. कारण कोरोनाच्या उद्रेकानं सर्वत्र थैमान घातलं होतं. त्यामळेच या लसीची कार्यक्षमता १०० टक्के नसून कोविशिल्डची कार्यक्षमता फक्त ६२ टक्के आहे. कोवॅक्सिनच्या शेवटच्या टप्प्याताली चाचणीतील माहिती अजूनही समोर आलेली नाही. ही लस ८२ टक्के परिणामकारक ठरत असल्याचं तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
कोरोनाची लस घेतल्यानंतर चाचणी पॉझिटिव्ह येण्याचं सगळ्यात मोठं कारण कोरोनाचा बदलता स्ट्रेन हे असू शकतं. दक्षिण आफ्रिका, युके, ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेतील स्ट्रेनशी लढण्यासाठी भारतीय लस कितपत प्रभावी ठरू शकते याबाबत शंका आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार लसीच्या दोन डोसमधील अंतर तीन महिने तसंच बारा आठवड्याचे असू शकते. आपल्याकडे दोन डोसमध्ये चार आठवड्याचे अंतर ठेवायला सांगितले जात आहे. यामुळे देखील चाचणी पॉझिटिव्ह येण्याची शक्यता आहे. जबरदस्त! पठ्ठ्यानं लाकडापासून बनवली रॉयल एन्फिल्ड बुलेट; रियल बुलेटपेक्षा भारी लूक पाहून व्हाल अवाक्
लस घेतली म्हणजे आपण कोरोनापासून बचावलो आणि आता कोरोनाचा धोका नाही. असा गैरसमज अनेकांचा झाला आहे. त्यामुळे लोक मास्कच्या वापराबाबत जागरूक नाहीत. सोशल डिस्टेंसिंग पाळलं जात नाहिये, सॅनिटायझर वापरण्याचं प्रमाण कमी झालंय. अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे कोरोनाची लस घेऊनही चाचणी पॉझिटिव्ह येण्याची शक्यता असते. Healthy Breakfast Ideas : कमी कॅलरीजसह पौष्टीक नाष्ता करायचा असेल तर हे ५ पर्याय ठरतील बेस्ट ऑप्शन; फिट राहण्याचा सोपा फंडा