कोरोना व्हायरसच्या अनेक लसी या शर्यतीत पुढे असून एक्स्ट्राजनेका लसीला मोठं यश मिळाले आहे. या कंपनीची लस वृद्धांमध्येही नोव्हेल कोरोना व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी परिणामकारक ठरली आहे. वृद्धांमध्ये इम्यून रिस्पॉन्स विकसित करण्यासाठी ही यशस्वी ठरली आहे. फायनॅंशियल टाईम्समध्ये छापण्यात आलेल्या एका रिपोर्टनुसार या लसीमुळे वृद्धांच्या शरीरात प्रोटेक्टिव्ह एंटीबॉडीजचा विकास झाला आहे. या रिपोर्टमध्ये रिसर्चशी निगडीत असलेल्या दोन अज्ञातांचा हवाला देण्यात आला होता.
एक्स्ट्राजेनका या कंपनीने ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांसह मिळून ही लस तयार केली आहे. या लसीची एंडवान्स चाचणी भारतात सुरू आहे. भारतात या लसीला कोविशिल्ड असे नाव देण्यात आले आहे. सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाने एक्स्ट्राजेनकाने कोविशिल्ड या लसीसाठी १०० कोटी डोसचा करार केला आहे. जुलैमध्ये ऑक्सफोर्डची लस आणि इम्यूनोजेनिसिटीच्या माहिती देण्यात आली होती. रक्त तपासणी रिपोर्टनुसार तेव्हा लस १८ ते ५५ वर्ष वयोगटातील स्वयंसेवकांसाठी लस परिणामकारक ठरली होती.
एक्स्ट्राजेनका कंपनीने सुरक्षेच्या कारणास्तव सप्टेंबरमध्ये चाचणी थांबवली होती. त्यावेळी ब्रिटनमध्ये एक स्वयंसेवक आजारी पडल्यामुळे अमेरिकेसह अनेक ठिकाणी चाचणी थांबण्यात आली होती. कोरोनाच्या शर्यतीत ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि एक्स्ट्राजेनेका मिळून तयार करत असलेली लस ही सगळ्यात पुढे असून कंपनी सावधगिरी बाळगून चाचणी करत आहे. ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शी आहे.
जगभरातील अनेक देशातील लोकांनी या लसीचे कोट्यावधी डोज विकत घेण्यासाठी व्यवहार केला आहे. पुढच्यावर्षी सुरूवातीच्या तीन महिन्यांच्या आत लस तयार होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. जगभरात अशा नऊ लसी आहेत. ज्या एंडवान्स चाचणीत आहेत. यात फायजर, मॉर्डना आणि चीनी कंपनीच्या पाच लसींचा समावेश आहे. मास्क लावताना आणि काढल्यानंतर तुम्हीही याच चुका करता? तज्ज्ञांनी सांगितला बचावाचा उपाय
पाच प्रकारच्या लसी सीरम इन्स्टिट्यूट तयार करणार
सीरम इन्स्टिट्यूट २०२१-२२ च्या शेवटापर्यंत जगभरासाठी एकूण पाच वेगवेगळ्या लसी तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत. जवळपास १ अब्ज डोस तयार केले जाणार आहेत. पुनावाला यांनी सांगितले होते की, ''आमची योजना प्रत्येक तिमाहीत लस लॉन्च करण्याची आहे. या योजनेची सुरूवात कोविशिल्डपासून होणार आहे. पुढच्या वर्षी ही लस यशस्वीरित्या तयार झालेली असेल. '' कोरोना काळात तरूणांनाही होऊ शकतो सांधेदुखीचा त्रास; निरोगी राहण्यासाठी तज्ज्ञांनी दिल्या टिप्स
कोविशिल्ड या लसीचा विकास ब्रिटनच्या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीतील जेनर इन्स्टिट्यूटद्वारे करण्यात आला आहे. या लसीचे लायसेंस एक्स्ट्राजेनेका कंपनीकडून प्राप्त झाले आहे. या लसीची शेवटच्या टप्प्यातील चाचणी भारतातील १६०० लोकांवर होणार आहे. ही लस पुढच्यावर्षी लॉन्च होऊ शकते. जवळपास २ ते ३ कोटी डोस तयार करण्याची सुरूवात झाली आहे. पुढे लसीचे उत्पादन वाढवून ७ ते ८ कोटी लसी तयार करण्यात येणार आहेत. दिलासादायक! भारतात १०० स्वयंसेवकांवर होणार स्पुटनिक-व्ही लसीची चाचणी, सरकारनं दिली परवानगी