जगभरासह भारतात कोरोनाची माहामारी वेगानं पसरत आहे. दिवसेंदिवस कोरोनाचं संक्रमण झालेल्या रुग्णांचा आकडा वाढत आहे. कोरोना विषाणूंची लागण झालेल्या लोकांच्या उपचारांसाठी गंभीर आजारात वापरात असलेल्या औषधांचा तसंच टी सेल्स थेरेपी, प्लाझ्मा थेरेपीचा वापर केला जात आहे. कोरोनावर मात करण्यासाठी आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी प्लाझ्मा थेरेपी परिणामकारक ठरत असल्याचा दावा मागील काही महिन्यांपासून तज्ज्ञांकडून केला जात होता.
कोरोना व्हायरसच्या संक्रमणातून बाहेर आलेल्या रुग्णांच्या शरीरातून प्लाझ्मा घेऊन इतर कोरोना रुग्णाचे उपचार केले जात आहेत. दरम्यान प्लाझ्मा थेरेपीबाबत संशोधनातून नवीन माहिती समोर आली आहे. प्लाझ्मा थेरेपीने उपचार करूनही कोरोना रुग्णांचा मृत्यूदर कमी झालेला दिसून आला नाही. हे संशोधन एम्स रुग्णालयात करण्यात आले होते. कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या शरीरातून एँटीबॉडीज घेऊन कोरोनाबाधित रुग्णाचे उपचार केले जात होते.
एम्सचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी गुरूवारी दिलेल्या माहितीनुसार एम्समधील ३० रुग्णांवर हा रिसर्च करण्यात आला होता. पण परिक्षणादरम्यान प्लाझ्मा थेरेपीचा कोणताही परिणाम दिसून आला नाही. या परिक्षणादरम्यान दोन गट करण्यात आले होते. एका गटावर प्लाझ्पा थेरेपीने उपचार करण्यात आले तर इतर दुसऱ्या गटावर वेगळ्या पद्धतींनी उपचार करण्यात आले. परिणाम दोन्ही गटातील रुग्णांची शारीरिक स्थिती समान होती. मृत्यूदरातही बदल झाला नव्हता.
डॉ. गुलेरिया यांनी सांगितले की, हे विश्लेषण अंतरिम असून प्लाझ्मा थेरेपीचा वापर उपचारादरम्यान किती परिणामकारक ठरू शकतो याबाबत अधिक अभ्यास केला जाणार आहे. प्लाझ्माचीही सुरक्षेच्या दृष्टीने तपासणी व्हायला हवी. म्हणजे यात कोरोनाशी लढण्यासाठी आवश्यक असलेल्या एंटीबॉडीज असायला हव्यात. बुधवारी तिसऱ्या नॅशनल क्लीनिकल ग्रँड राउंड्समध्ये प्लाझ्मा थेरेपी आणि कोरोना व्हायरसने पिडीत असलेल्या रुग्णांवर पडणारा प्रभाव यांवर चर्चा करण्यात आली होती. वेबिनारमध्ये औषधी विभागाचे प्राध्यापक डॉ. मोनीष सोनेजा यांनी दिलेल्या माहितीनुसार प्लाझ्मा सुरक्षित आहे. पण प्लाझ्माच्या प्रभावाबाबत अजूनही हिरवा कंदील मिळालेला नाही.
खरंच तुमच्या मास्कने कोरोना संसर्गापासून होतोय बचाव? घरच्याघरी 'ही' ट्रिक वापरून तपासा
आनंदाची बातमी! भारतात लॉन्च झालं कोरोनाचं औषधं 'कोविहॉल्ट'; ४९ रुपयांत रुग्णांसाठी उपलब्ध होणार