कोरोना व्हायरसनं पुन्हा एकदा हात पाय पसरायला सुरूवात केली आहे. दिवसेदिवस अधिकच घाबरवणारी आकडेवारी समोर येत आहे. कोरोना व्हायरसची दुसरी लाट अद्याप येणे बाकी आहे, परंतु ही पूर्वीपेक्षा जास्त गंभीर असू शकते. आठवड्याच्या अखेरीस, एका दिवसात सुमारे 3000 रुग्णांची नोंद झाली आहे. ख्रिश्चन मेडिकल कॉलेज, लुधियाना येथे गणिताच्या प्रमाणांच्याआधारे संशोधकांनी याबाबत अंदाज लावला आहे.
कोरोना व्हायरसची दुसरी लाट असू शकते गंभीर
या आठवड्यानंतर आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यात पुन्हा एकदा संक्रमणाच्या घटनांमध्ये वाढ पाहावी लागेल, असे या अहवालात म्हटले आहे. कोविड -१९ चे राज्य नोडल अधिकारी डॉ. राजेश भास्कर म्हणतात की, '' त्यानंतर संसर्गाची प्रकरणे कमी होऊ लागतील. परंतु दैनंदिन रुग्णांमध्ये संख्येमध्ये घट होणार की नाही याबाबत सांगता येणार नाही. ''
राज्यात कोरोना माहामारीची पहिली लाट १७ सप्टेंबरला आली होती. त्यावेळी २ हजार ८९६ संक्रमित रुग्णांची नोंद करण्यात आली होती. २ डिसेंबला सगळ्यात जास्त म्हणजेच एका दिवसात १०६ मृत्यू झाले होते. कोरोना व्हायरसच्या संक्रमितांची संख्या २ हजार ६६९ नोंदवण्यात आली होती. मृत्यूदर कमी झाला होता.
पंजाबचे मुख्य सचिव विनि महाजन यांनि 'ट्रिब्यून'शी बोलताना सांगितले की, ''सध्याच्या काळात आरोग्य व्यवस्था अधिक मजबूत असणं गरजेचं आहे. सर्व नियमांचे पालन केले जावे यासाठी लोकांना आवाहन करण्यात येत आहे.'' साथीच्या दुसर्या लाटेला सामोरे जाण्यासाठी धोरण व्यवस्थापनाच्या मुद्दयावर मुख्य सचिव म्हणाले की, लोकांचे जीवन व जीवनमान उंचावणं सरकारचे लक्ष आहे. मुख्यमंत्र्यांनी असे सांगितले की, ''आर्थिक हालचाली थांबवाव्या लागतील अशी कोणतीही परिस्थिती नाही. लोकांच्या सहकार्याने आणि नियमांचे पालन करून आपण भयानक परिस्थितीतून बाहेर येऊ," अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
आता आणखी काळजी घ्यावी लागणार! किडनीवर हल्ला करतोय कोरोना व्हायरस; संशोधनातून मोठा खुलासा
दरम्यान देशातील पाच राज्यांत कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून, नवीन ८० टक्के रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील सक्रिय रुग्ण वाढण्यामागे महाराष्ट्र, केरळ आणि पंजाब या राज्यातील रुग्णसंख्या कारणीभूत आहे. देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत या राज्यांतील रुग्णांचे प्रमाण ७६,४८ टक्के इतके आहे. त्यामुळे पुन्हा एकदा केंद्र सरकारसह त्या - त्या ठिकाणचे राज्य सरकारही सतर्क झाले असून, त्यांनी कठोर निर्बंधांची प्रक्रिया हाती घेतली आहे.
देशात दैनंदिन रुग्णसंख्या वाढीस महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि छत्तीसगड या राज्यांतील संसर्ग कारणीभूत आहे. देशातील दैनंदिन रुग्णसंख्येत त्यांचे प्रमाण तब्बल ८०.६३ टक्के इतके आहे. राज्यात सलग दोन दिवस २५ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली, तर पंजाबमध्ये २ हजार ३६९, केरळमध्ये १ हजार ८९९ इतके रुग्ण आढळले. सध्या देशात २ लाख ७१ हजार २८२ रुग्ण उपचाराधीन आहेत.