भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूंच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. बुधवारी देशात २२७५२ कोरोना रुग्ण समोर आले. कोरोनाच्या बदलत्या स्वरूपामुळे डॉक्टरांच्या अडचणीत भर पडली आहे. जगभरात संशोधन सुरू असताना माहामारीच्या वाढत्या प्रसाराबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे. ओनली माय हेल्थने दिलेल्या अहवालानुसार हैदराबादच्या चेस्ट आणि किंग कोटी रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की, ज्या लोकांमध्ये ही लक्षणं दिसून येत आहेत. त्यांचे उपचार आणि निदान होण्यासाठी खूप उशीर होत आहे.
कोरोना व्हायरसच्या नवीन लक्षणांमध्ये डोळे येणं, मळमळणं, अतिसार होणं यांचा समावेश आहे. याशिवाय थंडी वाजणे, श्वास घ्यायला त्रास होणं, मासपेशींमध्ये वेदना, डोकेदुखी, घसा खवखवणं, सुगंध न जाणवणं, श्वास घ्यायला त्रास होणं यांचा समावेश आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाची नवी लक्षणं समोर आल्यानंतर अशा शारीरिक समस्या जाणवत असल्यास सगळ्यात आधी उपचार करायला हवेत.
सर्दी, खोकला, ताप या जुन्या लक्षणांसोबतच नवीन लक्षणं दिसत असलेल्या लोकांना काळजी घ्यायला हवी. कोरोना व्हायरस वातावरणातील बदलांमुळे आपले स्वरुप बदलत असल्यामुळे लक्षणांमध्ये बदल दिसून येत आहे. या कालावधीत व्हायरसची जीनोमिक संरचना बदलत आहे.
एका रिपोर्टनुसार पावसाळ्यात फुड पॉईजनिंगमुळे पोट खराब होणं, अतिसार होणं अशा समस्या जास्त उद्भवत आहे. पण आता कोरोना व्हायरस हा फुफ्फुसांसोबतच गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅकवर हल्ला करत असल्यामुळे कोरोना रुग्णांमध्ये अतिसार, उलट्या अशी लक्षणं दिसून आली आहेत. अनेकदा उलट्या होणं किंवा जुलाब होणं असा समस्या अपचनामुळे उद्भवल्याचे समजून लोक दुर्लक्ष करतात. परिणामी ऑक्सिनजनची कमतरता भासणं, बेशुद्ध होणं तसंच रक्तदाबाच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.
खुशखबर! संशोधकांचं मोठं यश; हवेतून पसरणाऱ्या कोरोना संसर्गाला रोखणार हा 'खास 'फिल्टर'
मोठा दिलासा! तज्ज्ञांनी शोधलं कोरोना विषाणूंचा प्रसार थांबवण्याचं औषध; 'असा' थांबेल प्रसार