कोरोना व्हायरसनं संपूर्ण जगभरात हाहाकार निर्माण केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाची गंभीर लक्षणं असलेल्या रुग्णांना स्टरॉईड दिलं जाऊ शकतं. जून महिन्यात ऑक्सफओर्ड युनिव्हर्सिटीकडून रिकव्हरी ट्रायल सुरू करण्यात आलं होतं. यात असं दिसून आलं की, दर ८ पैकी एका गंभीर स्थितीतील कोरोना रुग्णाचा जीव डेक्सामेथासोन्स स्टेरॉईडमुळे वाचला आहे. या चाचण्याव्यतिरिक्त इतर अनेक परिणाम समोर आले आहे. त्यातून हायड्रोरकार्टसोन नावाचे स्टेरॉईड रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी प्रभावी ठरल्याचं दिसून आलं आहे.
हाइड्रोकार्टिसोन स्वस्त असल्यामुळे सहज उपलब्ध होऊ शकतं. अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या जर्नलमध्ये ७ चाचण्याचे निकाल प्रकाशित करण्यात आले आहेत. या नुसार या दोन स्टेरॉइडने कोरोनामुळे गंभीर स्थिीत असलेल्या रुग्णांच्या मृत्यूचा धोका २० टक्क्यांनी कमी होतो. या संशोधनाचे लेखक आणि ब्रिस्टल युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक जोनाथन स्टर्न यांनी सांगितले की, स्टेरॉईड एक स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारं औषधं आहे. हे औषधं कोणत्याही वयोगटातील कोरोना रुग्णांचा मृत्यू होण्यापासून वाचवण्यासाठी परिणामकारक ठरत आहे.
रिकव्हरी ट्रायल ब्राजील, फ्रांससह इतर अनेक देशांमध्ये करण्यात आलं होतं. हाइड्रोकार्टिसोन आणि डेक्सामेथासोन स्टेरॉईड ही औषध गंभीर स्थितीतील कोरोना रुग्णांसाठी प्रभावी ठरत आहेत. ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटीचे प्राध्यापक आणि रिकव्हरी ट्रायलचे डेप्यूटी चीफ मार्टिन लँडरे यांच्यामते जेव्हा रुग्णांला श्वास घ्यायला त्रास होत असेल तर तेव्हा व्हेंटिलेटरची वाट न पाहता स्टेरॉईड द्यायला हवं.
मे महिन्यात ७ ते ८ टक्के लोकांना हे औषध देण्यात आलं होतं. जूनच्या शेवटापर्यंत या औषधाचा वापर ५५ टक्क्यांनी वाढला. हाइड्रोकार्टिसोनचे ट्रायल इंपीरियल कॉलेज लंडनचे प्राध्यापक एंथोना गार्डन यांच्या नेतृत्वात करण्यात आलं होतं. हे परिक्षण ८८ रुग्णांवर करण्यात आलं होतं. जगभरातील अनेक रुग्णालयांमध्ये कोरोनामुळे होणारा मृत्यूदर कमी करण्यासाठी या स्टेरॉइड्सचा वापर केला जात आहे.
स्टेरॉइड एका प्रकारचे केमिकल आहे . हे माणसाच्या शरीरात तयार होते. स्टेरॉइडला वेगळ्या औषधाच्या नावानं ओळखलं जातं. मासपेशींच्या विकासासाठी या औषधाला परिणामकारक समजलं जात आहे. अनेकजण आपली शरीरयष्टी प्रभावी होण्यासाठी स्टेरॉईड्सचे सेवन करतात. पण कोणत्याही स्पर्धेत भाग घेण्याआधी स्टेरॉइटचा वापरावर प्रतिबंध घालण्यात आले आहेत.
अधिकवेळा स्टेरॉइडचा वापर केल्यानं गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे लोकांना सर्दी, खोकला, ताप असं इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. अनेकदा स्टेरॉईड्चा अतिवापर करणं जीवघेणंही ठरू शकतं. म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही औषधांचे सेवन करू नका.
हे पण वाचा-
काळजी वाढली! २ मीटर अंतरावरूनही संसर्गाचा धोका; हवेतील कोरोना प्रसाराबाबत तज्ज्ञांचा खुलासा
'कोरोनाच्या लसीबाबत खोट्या आशा अपेक्षा दाखवू नका'; आरोग्य तज्ज्ञांचे PM मोदींना पत्र
coronavirus: अशा ठिकाणी अधिक वेगाने पसरतो कोरोना विषाणू, संशोधनातून समोर आली माहिती