शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

चिंताजनक! कोरोनाचा अंत इतक्यात होणार नाही; संयुक्त राष्ट्र प्रमुखांची धोक्याची सुचना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2020 7:29 PM

कोरोनामळे जगभरात तब्बल १० लाख लोकांचा मृत्यू झाल्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी ही धोक्याची सुचना दिली आहे.

कोरोनाचा प्रसार जगभरात दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाची दुसरी आणि तिसरी लाटही येऊ शकते अशी अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या प्रमुखांनी कोरोना व्हायरसच्या संक्रमणाबाबत गंभीर सुचना दिली आहे. संयुक्त राष्ट्राचे सेक्रेटरी जनरल एन्टोनियो गुटेरेस यांनी सांगितले की, कोरोना व्हायरसचा शेवट इतक्यात होणार नाही.  कोरोनाच्या संक्रमणामुळे अनेक कुटुंबांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे.  चांगलं जीवन जगणं आणि शोक करणं या दोन्हीही गोष्टी अशक्य झाल्या आहेत.कोरोनामळे जगभरात तब्बल 10 लाख लोकांचा मृत्यू झाल्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी ही धोक्याची सुचना दिली आहे.

 कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 10 लाखांमध्ये पोहोचल्यानं अत्यंत गंभीर स्थिती असल्याचे संयुक्त राष्ट्र प्रमुखांनी  सांगितले. की कोरोना संक्रमणामुळे जात असलेल्या नोकऱ्या आणि होणारं नुकसान याचा शेवट कुठेही  दिसत नाही. जबाबदार नेतृत्व, विज्ञान  यांच्या साहाय्याने माहामारीला नष्ट करता येऊ शकतं. कोरोनाची कोणतीही लस उपलब्ध झाल्यास ती लस  सगळ्यांनाच परवडू शकेल अशी असायला हवी. असं मत यांनी यावेळी व्यक्त केले. 

दरम्यान महाराष्ट्रातही कोरोनाचा धोका वाढला आहे. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ही 13 लाखांवर गेली असून आतापर्यंत 35 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. राज्यात सोमवारी (28 सप्टेंबर) कोरोनाचे 11,921 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 180 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांची एकूण संख्या 13,51,153 वर पोहोचली आहे.

कोरोना लस यशस्वी ठरण्याची गॅरेंटी नाही' WHO च्या प्रमुखांचा इशारा

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अडनहॅम यांनी मंगळवारी एक धक्कादायक विधान केलं होतं. 'कोविड १९ ज्या ज्या लसींवर काम सुरू आहे. त्या लसी कोरोनावर मात करण्यासाठी यशस्वी ठरतील याची कोणतीही शाश्वती देता येणार नाही.' जागतिक आरोग्य संघटनेच्या बैठकीदरम्यान प्रमुख टेड्रोस अडनहॅम यांनी सांगितले होते की, ''जगभरात ज्या कोरोना लसींवर काम सुरू आहे. त्या लसी प्रत्यक्षात कितपत परिणामकारक ठरतील याची शाश्वती देता येणार नाही.

आतापर्यंत अनेक लसींची पडताळणी जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात आली आहे. लवकरच सुरक्षित आणि प्रभावी लस मिळेल अशी आशा आम्हाला आहे.''  याशिवाय त्यांनी सांगितले होते की, २०० लसींवर सध्या काम सुरू आहे. कोविड १९ च्या अनेक लसी प्री क्लीनिकल टेस्टिंगमध्ये आहे. लस निर्माण प्रक्रियेत काही लसी यशस्वी होतात. तर काहींना अपयशाचा सामना करावा लागतो. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य