शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

CoronaVirus News : उपरणे, ओढणी, पदराचा मास्क म्हणून वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 1:55 AM

अशा गोष्टी मास्क म्हणून का चालत नाहीत. कुठलाही मास्क हा विषाणू संसर्ग रोखण्यासाठी त्याचे तीन पदर असावे लागतात. यातील मधला पदर हा अर्ध सच्छिद्र म्हणजेच सेमीपरमीएबल असायला हवा.

- डॉ. अमोल अन्नदाते

(लेखक बालरोगतज्ज्ञ असून वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)

सध्या अनेक जण मास्क म्हणून रुमाल, ओढणी, साडीचा पदर, गमचे, उपरणे असे घरगुती कपड्याचा तात्पुरता मास्क म्हणून वापर करताना दिसत आहेत. रुग्णालयात येणारे ५० टक्के असेच आत किंवा डॉक्टरसमोर येतात. या गोष्टी संसर्गापासून रक्षण करू शकत नाही.अशा गोष्टी मास्क म्हणून का चालत नाहीत. कुठलाही मास्क हा विषाणू संसर्ग रोखण्यासाठी त्याचे तीन पदर असावे लागतात. यातील मधला पदर हा अर्ध सच्छिद्र म्हणजेच सेमीपरमीएबल असायला हवा. मधला पदर हा तोंड व नाकातून बाहेर येणारे श्वासकण फक्त रोखतच नाही तर ते पकडून ठेवतो. म्हणजेच ते शोषून घेतो आणि मास्क बाहेरून ओला होऊ देत नाही. बाहेरून ओला झालेला मास्क ही हवेतील धूळ त्यावर बसून त्रासदायक ठरू शकतो. तीन पदरांचे हे तत्त्व रुमाल, ओढणी, साडीचा पदर व अशी कुठलीही गोष्ट तोंडाभोवती बांधल्यास पाळली जात नाही. आम्ही अशा गोष्टीचे तीन पदर बनवून तोंड व नाकाभोवती गुंडाळू असे कोणी म्हणत असल्यास त्याचाही उपयोग होणार नाही. कारण या तीन गुंडाळ्यात मधला पदर अर्धसच्छिद्र नसतो. म्हणून असे घरगुती कपड्याचे मास्क न वापरता व्हाल्व नसलेले तीन पदरी मास्कच वापरावे.रुमाल, गमचे, ओढणी मास्क म्हणून वापरल्यास कामाच्या ठिकाणी, इतरांशी बोलताना रुमाल खाली करावा लागतो व अशी सवय लागते; पण मास्कच्या बाबतीत सहसा असे करावे लागत नाही.मास्क घालून नीट बोलता येते. रुमाल, ओढणी वापरल्यास ती वारंवार अ‍ॅडजस्ट करावी लागते. मास्क आता आपल्या जीवनशैलीचा भाग बनत चालल्याने नियमित वापरल्यास त्याची सवय लागेल. पण रुमाल, ओढणीची सवय लागणे अवघड आहे. मास्कच्या अवतीभवती संसर्गकण बाहेर जाणार नाहीत; पण श्वास घेण्यास थोड्या फार हवेची ये-जा होईल इतकी जागा राहते म्हणून श्वास व हवेसाठी तो वारंवार खाली करावा लागत नाही. घरगुती कपडे घट्ट बांधल्यास अशी हवेची ये-जा होण्यास जागा राहत नाही. नाकाचे वरचे टोक ते हनुवटीच्या खालपर्यंत नाक व तोंड झाकलेले असावे, हे तत्त्व घरगुती कपडे वापरून पाळता येत नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य