कोरोनाच्या माहामारीत आता ६ महिन्यांनंतर जागतिक आरोग्य संघटनेनं भारताला आवाहन केलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार ही माहामारी लवकर संपणार नाही. त्यामुळे भारतासह अनेक देशांनी कोरोना संक्रमणाशी सामना करण्यासाठी तयारी करणं गरजेचं आहे. भारतात कोरोना संक्रमणचा दर कमी ठेवण्यासाठी तज्ज्ञांनी आवाहन केलं आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या पूर्व आशियातील क्षेत्रीय प्रमुख डॉ. पूनम खेत्रपाल यांनी सांगितले की, जगभरात कोरोनाचं संक्रमण पसरत आहे. कोरोनाची माहामारी लवकर आटोक्यात येईल असं वाटत नाही. अशा स्थितीत भारत सरकार आणि राज्य सरकारने कोरोनाशी सामना करण्यासाठी तयार करायला हवी. जोपर्यंत कोरोना व्हायरसची लस येत नाही तोपर्यंत सर्वच देशातील लोकांना एकत्र येऊन या माहामारीचा सामना करायला हवा असंही त्यांनी सांगितले. त्यामुळे कोरोनामुळे वाढणारा मृत्यूदर कमी होण्यास मदत होईल.
डॉ खेत्रपाल यांनी भारतासह दक्षिण पूर्व आशियाई देशांना सल्ला दिला आहे की त्यांनी चाचण्या, आयसोलेशन, तपासण्या, स्वच्छता आणि सोशल डिस्टेंसिंग या गोष्टींकडे अधिक लक्ष द्यायला हवं. उत्तम वैद्यकिय सेवा देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. याशिवाय जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले की अनेक ठिकाणी आरोग्य सेवा आधीपेक्षा चांगल्या झाल्या आहेत. टेस्टींग्सची संख्या वाढवण्यात आली आहे. रुग्णाकडे अधिक लक्ष दिलं जात आहे.
दरम्यान कोरोना नियंत्रणात आणण्याबाबत जागतिक आरोग्य संघटनेनं भारताचं कौतुक केलं आहे. तज्ज्ञांच्यामते भारतात वाढत्या रुग्णसंख्येमागे वाढणारी लोकसंख्या कारणीभूत ठरत आहे. तरिही भारत सरकारकडून याची दखल घेत कोरोना टेस्टिंगवर भर देण्यात आला. तसंच वैद्यकिय सेवा उत्तम करण्यावर भर देण्यात आला. इतर देशांच्या तुलनेत भारत कोरोनाची यशस्वीरित्या लढा देत असल्याचे तज्ज्ञ म्हणाले.
CoronaVirus News : रुग्णालयात बेड मिळाला नाही, म्हणून रुग्णानं उभारलं रुग्णालय अन्...
'या' सवयीमुळे वाढत आहे कोरोनाचा संसर्गाचा धोका; आरोग्य मंत्रालयाची माहिती