शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
अजित पवार गट टेन्शनमध्ये! येवल्यातून भुजबळ, अणुशक्ति नगरमधून नवाब मलिक पिछाडीवर
3
झारखंडमध्ये एनडीए आणि ‘इंडिया’त टफफाईट, सुरुवातीच्या कलांमध्ये दिसतंय असं चित्र
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : कोल्हापूर दक्षिणमध्ये मोठी घडामोड, अमल महाडिक २०१२ मतांनी आघाडीवर; कोण मारणार बाजी ?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 बविआला राडा भोवणार! नालासोपाऱ्यात भाजपाचा उमेदवार आघाडीवर, क्षितिज ठाकूरांचा गेम होणार? 
6
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
8
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : Video - "पुन्हा एकदा..."; निकालाच्या दिवशी नेतेमंडळी सिद्धिविनायकाच्या चरणी नतमस्तक
10
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
11
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
12
व्हॉट्सॲप ग्रुपवरून ज्ञान, घरीच केली प्रसूती; चेन्नईतील खळबळजनक घटना
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
14
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
16
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
18
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
19
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
20
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!

Coronavirus: काेराेनामुक्त नागरिकांना सतावतेय वजन वाढण्याची समस्या; सरकारी रुग्णालयात तक्रार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2021 12:48 AM

काेराेना कालावधीत कमी झालेले वजन आता वाढत आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. 

रायगड : काेराेनावर मात केलेल्यांना आता विविध समस्यांना सामाेरे जावे लागत आहे. केस गळणे, दम लागणे, थकवा जाणवणे अशी लक्षणे दिसत असतानाचा आता वजन वाढण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते आहे. मात्र वजन वाढल्याची तक्रार अद्यापही जिल्हा सरकारी रुग्णालयात काेराेनावर मात केलेल्या रुग्णांनी केली नसल्याचा दावा आराेग्य यंत्रणेने केला आहे.

मार्च महिन्यापासून काेराेनाने जिल्ह्यात शिरकाव केला. त्यानंतर या घातक विषाणूने चांगलेच थैमान घातले. काेराेनामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये दहशत निर्माण झाली हाेती. सरकार प्रशासन विविध उपाययाेजना करत हाेते. दीड हजाराहून अधिक काेराेना रुग्णांचा बळी गेला. 

काेराेनावर लसच उपलब्ध नसल्याने रेमडेसिवीर, त्याचप्रमाणे अन्य राेगप्रतिकारशक्ती वाढवणारी औषधे रुग्णांना देण्यात आली आहेत. त्यामुळे या आणि अन्य औषधांमध्ये स्टेराॅइडचे प्रमाण असल्याने विविध दुष्परिणाम आता समाेर येत आहेत.स्टेराॅइडमुळे वजन वाढत असल्याचे समाेर येत आहे. काेराेना कालावधीत कमी झालेले वजन आता वाढत आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. 

कोरोनामुक्त रुग्णांचे अनुभवकाेराेनाच्या कालावधीत प्रकृती चांगलीच खालावली हाेती. सुरुवातीला ८० किलाे वजन हाेते. काेराेना झाल्यामुळे वजन तब्बल २० किलाेने कमी झाले हाेते. काेराेनावर मात केल्यानंतर सुरुवातीला खूपच थकवा जाणवत हाेता. ताेंडाला चव नसल्याने काही खाण्याची-पिण्याची इच्छा नव्हती. बरे झाल्यानंतर वजन ९० किलाेपर्यंत गेले. त्यामुळे मी आता ते पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या ८४ किलाे वजन झाले आहे.

काेराेनातून बरे झाल्यानंतर केस गळण्यास सुरुवात झाली. अधूनमधून दम लागत असल्याने जास्त श्रम करता येत नाहीत. कधी तरी डाेळे चुरचुरतात. आता वजन वाढत आहे. भूक लागत नसल्याने काेराेनाकाळात वजन कमी झाले हाेते. मात्र आता वजन चांगलेच वाढले आहे, ते नियमित करण्यासाठी व्यायाम करण्यात येत आहे.

स्टेराॅइडमुळे वजन वाढू शकतेकाेराेनावर आता लस उपलब्ध झाली आहे. सुरुवातीला रेमडेसिवीर तसेच राेगप्रतिकारशक्ती वाढवणारी औषधे काेराेना रुग्णांना देण्यात आली. स्टेराॅइडमुळे रुग्णांचे वजन वाढू शकते. काेराेनामुळे रुग्णांचे वजन २० किलाेने कमी झाल्याचे आढळले हाेते. काहींना केस गळण्याचा तर काहींना दम लागणे, थकवा जाणवणे अशा समस्या जाणवत आहेत. ताेंडाला चव नसल्याच्या तक्रारीही करण्यात आल्या आहेत. काेराेनावर मात केलेल्यांनी आरामाबराेबरच नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. याचबरोबर योग्य पोषण आहार घेणे आवश्यक आहे.

काेराेनावर सुरुवातीला लस उपलब्ध नव्हती. त्यामुळे रेमडेसिवीर, तसेच अन्य राेगप्रतिकारके रुग्णांना देण्यात आली. स्टेराॅइडमुळे वजन वाढण्याची शक्यता आहे. काेराेनावर मात केलेल्यांनी याबाबत तक्रार केलेली नाही. अचानक वजन वाढले असल्यास सकस आहार, आराम आणि नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. समस्या असल्यास नजीकच्या रुग्णालयाशी संपर्क साधावा. - डाॅ. राजीव तांबाळे, वैद्यकीय अधिकारी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या