शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

कोरोना रुग्णांची खोली आणि गर्दीपेक्षाही जास्त धोकादायक आहे; 'हे' ठिकाण, वेळीच व्हा सावध

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2020 1:22 PM

कोरोना रुग्णांची खोली आणि गर्दीच्या ठिकाणांपक्षाही एक असं ठिकाण आहे जे संक्रमणाचं कारण ठरत असतं.

भारतात कोरोना व्हायरसची लागण होत असलेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळे कोरोना विषाणूंची संख्या वाढतेय की काय अशी भीती सगळ्यांचाच मनात आहे. अशा स्थितीत जगभरातील तज्ज्ञ आणि WHO कडून वेगवेगळे उपाय सुचवले जात आहेत. एका अभ्यासानुसार कोरोना रुग्णांची खोली आणि गर्दीच्या ठिकाणांपक्षाही मोकळी आणि खेळती हवा नसलेलं बाथरूम धोकादायक असू शकतं. 

द लेसेस्टमध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे वुहानमधील संशोधकांनी हे स्पष्ट केले आहे की, एखाद्या खोलीत जर खिडकी नसेल तर संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार  ज्या ठिकाणी कोरोनाचा रुग्ण आहे अशा ठिकाणी व्हेंटिलेशन आणि सॅनिटायजेशनकडे लक्ष द्यायला हवं. इतकंच नाही तर ज्या बाथरूमध्ये व्यवस्थित हवा खेळती राहण्यास जागा नसेल तिथे संक्रमण होण्याचा धोका जास्त असतो. मोकळी हवा नसलेल्या बाथरूमध्ये कमी वेळातच लोकांना संक्रमणाचं शिकार व्हावं लागू शकतं. 

या संशोधनात नेजल स्प्रेच्या मदतीने लाळेच्या थेंबांची चाचणी करण्यात आली होती. यात असं दिसून आलं की, खिडकी किंवा दरवाजा उघडा आणि हवेशीर असेल तर एअरोसेल्स दूर होतात. तसंच तर व्हेंटिलेशल नसेल तर एअरोसेल्स तसेच राहतात. त्यामुळे संक्रमणाचा धोका वाढू शकतो. 

बचावासाठी उपाय

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी व्हेंटिलेशन नसलेल्या ठिकाणी जाताना मास्क घालून मग जायला हवं. त्यामुळे इन्फेक्शन टळणार नाही तर धोका कमी होऊ शकतो. मास्क वापरायला हवा, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळायला हवं.

सतत हात धुवायला हवेत. 

तोंडाला सतत स्पर्श करू नये.

खोकताना किंवा शिंकताना टिश्यूचा वापर करावा.

पावसाळ्यात वेगाने वाढत आहे कोरोनाचा धोका; इन्फेक्शन रोखण्यासाठी वापरा 'हा' रामबाण उपाय

प्रायव्हेट पार्ट्सवर तीव्रतेने खाज येण्याची 'ही' असू शकतात कारणं; 'अशी' घ्या काळजी

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सcorona virusकोरोना वायरस बातम्या