शहरं
Join us  
Trending Stories
1
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
2
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
3
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
4
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
5
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
6
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
7
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
8
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
9
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
10
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
11
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
12
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
13
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
14
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
15
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
16
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
17
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
18
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
19
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
20
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत

Corona Virus : कोरोना महामारी आता संपली आहे का? WHO च्या शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी दिलं उत्तर, म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 4:30 PM

Corona Virus : सौम्या स्वामीनाथन यांच्या म्हणण्यानुसार, 'सध्या व्हायरसची उत्पत्ती आणि त्याच्या प्रसाराची कारणे याबद्दल अभ्यास सुरू आहेत. याबाबत सर्व प्रकारच्या शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत.

नवी दिल्ली : कोरोना संसर्गाचा वेग मंदावल्यानंतर लोकांमध्ये चर्चा सुरू झाली की, महामारी आता संपली आहे. याबाबत जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन (Soumya Swaminathan) यांनी इशारा देत मोठे विधान केले आहे. 'काही लोक वेळोवेळी घोषणा करत आहेत की, कोरोना महामारी संपली आहे. तर हे योग्य नाही. सध्या महामारी संपली असे कोणीही म्हणू शकत नाही. ती कधी संपेल हेही सांगता येत नाही.

त्यामुळे कोरोना महामारी संपल्याबद्दल बोलून अशा गोष्टींवर विसंबून राहून सर्व सावधगिरी सोडणे अत्यंत मूर्खपणाचे ठरेल. कोरोनाचा नवीन व्हेरिएंट (New Corona Variant) कुठेही, कधीही उद्भवू शकतो आणि आपण वळसा घालून चौरस्त्याच्या त्याच कोपऱ्यात पोहोचू शकतो जिथून आपण सुरुवात केली होती. त्यामुळे अजूनही अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे', असे सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले. 

ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीत सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले की, 'जगात कोरोनाचे जेमतेम 100 रुग्ण होते, तेव्हा जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिला होता. मात्र त्यानंतर हा इशारा कोणीही गांभीर्याने घेतला नाही. मौल्यवान वेळ वाया गेला. यानंतर अमेरिका  (USA) आणि युरोपमध्ये (Europe) कशा प्रकारचा विध्वंस झाला ते पाहिले. आपल्या एका लहान निष्काळजीमुळे तो भयानक काळ परत आणू शकतो. आफ्रिकन देशांतील 85 % लोकांना अजूनही कोरोना लसीचा पहिला डोसही मिळालेला नाही, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.

ही परिस्थिती कोरोनाचे नवीन व्हेरिएंट निर्माण आणि पसरवण्यासाठी कारणीभूत ठरू शकते. आपल्याला दीर्घकाळ कोरोनाशी संबंधित खबरदारीचे पालन करावे लागेल. कोरोना आणि त्याच्याशी निगडीत या खबरदारीसोबत जगायला शिकले पाहिजे. सध्या नाही, पण 2022 पर्यंत आपण अधिक चांगल्या स्थितीत असू. त्यावेळी हा व्हायरस आता कोणत्या स्थितीत आहे आणि तो किती काळात संपू शकतो हे आम्ही चांगल्या प्रकारे सांगू शकू, असे  सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले. 

चीनच्या वुहान लॅबमधून कोरोना आला हे नाकारता येत नाही, पण.. सौम्या स्वामीनाथन यांच्या म्हणण्यानुसार, 'सध्या व्हायरसची उत्पत्ती आणि त्याच्या प्रसाराची कारणे याबद्दल अभ्यास सुरू आहेत. याबाबत सर्व प्रकारच्या शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत. चीनच्या वुहान लॅबमधून (Wuhan Lab Of China) कोरोना व्हायरस लीक झाल्याचा हा सिद्धांतही पूर्णपणे नाकारला गेला नाही. या प्रकरणी आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की विषाणूची उत्पत्ती इतक्या सहज आणि लवकर सापडत नाही.

सार्स (SARS) प्रत्यक्षात Civet Cat पासून आला होता, हे शोधण्यासाठी शास्त्रज्ञांना वर्षानुवर्षे लागली. त्याचप्रमाणे, एमईआरएस (MERS) उंटांपासून आणि एचआयव्ही (HIV) चिंपांझीपासून आला हे कळायला अनेक वर्षे लागली. जोपर्यंत कोरोनाचा सवाल आहे, तर त्याबाबत आतापर्यंत असे दिसून येते की, हा वटवाघळांपासून (BAT) आला आहे. पण तो मानवापर्यंत कसा पोहोचला, हे अद्याप कळलेले नाही. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉनWorld health organisationजागतिक आरोग्य संघटनाHealthआरोग्य