कोरोना साथीच्या नियंत्रणात निदान चाचण्यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली आहे. आरटीपीसीआर किंवा रॅपिड अँटिजन चाचण्यांद्वारे विषाणूच्या संसर्गाचे निदान केले जाते. घरच्या घरी चाचणी करण्याची इच्छा असलेल्यांसाठी चाचणी किटही उपलब्ध आहे. मात्र आता कोरोनाचे सर्व व्हेरियंट्स एकाच टेस्टमधून कळणार आहेत.
टेस्ट कोणती?अमेरिकी शास्त्रज्ञांनी ‘कोव्हारस्कॅन’ ही टेस्ट शोधून काढली आहे. ही चाचणी ‘पॉलिमरेस चेन रिॲक्शन’वर आधारित आहे. हे तंत्र बहुतांश पॅथॉलॉजी लॅबमध्ये आरएनएची नक्कल करण्यासाठी अथवा मोजमापासाठी वापरले जाते.
खर्च किती?या चाचणीद्वारे समुदायात कोणता व्हेरियंट पसरलेला आहे हे आपणास तात्काळ कळू शकते. नवीन व्हेरियंटची माहितीही ही चाचणी देते. सूत्रांनी सांगितले की, पारंपरिक पद्धतीत विषाणूच्या व्हेरियंटचा पत्ता लावायचा असेल, तर त्याचा संपूर्ण जिनोम सिक्वेंस वापरावा लागतो. ही प्रक्रिया वेळखाऊ आणि महागडी आहे. त्यासाठी अत्याधुनिक उपकरणे लागतात. विषाणूच्या संपूर्ण आरएनए सिक्वेन्सचे विश्लेषण करावे लागते.
संशोधन कुणाचे?टेक्सास विद्यापीठ (यूटी) साऊथवेस्टर्न मेडिकल सेंटरच्या संशोधकांनी कोव्हारस्कॅन टेस्ट विकसित केली आहे.
४,००० नमुन्यांची तपासणी याद्वारे करण्यात आली आहे.‘क्लिनिकल केमिस्ट्री’ नियतकालिकात यासंबंधीचा अभ्यास प्रसिद्ध झाला आहे.ही चाचणी सध्या उपलब्ध असलेल्या इतर चाचण्यांप्रमाणेच अचूकसार्स-कोव्ह-२ विषाणूच्या सर्व व्हेरियंटमध्ये तफावत चाचणीद्वारे यशस्वीरीत्या कळते.