शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

CoronaVirus : लठ्ठपणाचे शिकार असलेल्यांना कोरोनाचा धोका जास्त असतो? वाचा रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 9:50 AM

या  रिसर्चनुसार ३० पेक्षा कमी बीएमआय असलेल्या रुग्णांच्या तुलनेत ३० ते ३४ बीएमआय असलेल्या लोकांना संक्रमण होण्याची शक्यता दुप्पट होती.

दिवसेंदिवस कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचा प्रसार जगभरात वाढत आहे. या महामारीमुळे मृत्यू होत असलेल्यांची संख्या वाढत चालली आहे. चीननतंर, इटली, अमेरिका, स्पेनसह भारतातसुद्धा कोरोनाचे संक्रमण वेगाने पसरत आहेत. दरम्यान ज्या ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्याठिकाणी कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश येत आहे.

सर्दी, खोकला, श्वास घ्यायला त्रास होणं कोरोनाची ही लक्षणं तुम्हाला माहीत असतील. या लक्षणांव्यतिरिक्त वेगळी लक्षणं दिसायला सुरूवात झाली आहे. सध्या अमेरिकेत झालेल्या संशोधनात असं दिसून आलं, लठ्ठपणाचे शिकार असलेल्या लोकांना कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचा धोका जास्त आहे.

न्यूयॉर्कमधील एका हॉस्पिटलमध्ये ३ हजार ६१५ लोक भरती झाले होते. या रुग्णांवर हा रिसर्च करण्यात आला होता. ऑक्सफोर्ट जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या रिसर्चनुसार लठ्ठपणाने त्रस्त असलेले लोक मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे शिकार आहेत. हा रिसर्च रुग्णांच्या बीएमआय म्हणजेच बॉडी मास इंडेक्सच्या आधारावर तयार करण्यात आला होता.

या  रिसर्चनुसार ३० पेक्षा कमी बीएमआय असलेल्या रुग्णांच्या तुलनेत ३० ते ३४ बीएमआय असलेल्या लोकांना संक्रमण होण्याची शक्यता दुप्पट होती. रिसर्चमध्ये सहभागी असलेल्या १६ टक्के लोकांचा  बीएमआय ३५ पेक्षा जास्त होता. ३७ टक्के लोक ओव्हर वेटमुळे कोरोना पॉजिटिव्ह आले होते. बॉडी मास इंडेक्समध्ये शरीराच्या उंचीनुसार वजन योग्य आहे की नाही हे पाहिलं जातं. साधारण बीएमआय २२.१ पेक्षा जास्त असू नये. ( हे पण वाचा-घाम आणि घामोळ्यांनी हैराण असाल, तर घरच्याघरी 'या' थंडगार पेयांनी नेहमी कूल रहा)

वयस्कर आणि आधीपासून आजारी असलेल्या लोकांना कोरोनाचा धोका अधिक आहे. असं या रिसर्चमध्ये दिसून आलं. यानुसार ६० वयापेक्षा जास्त असलेले लोक कोरोना व्हायरसचे शिकार होते. भारतात सुद्धा वयस्कर लोकांना मोठ्या प्रमाणावर कोरोनाची लागण झाली आहे. लंडनच्या इंपीरियल कॉलेजचे श्वसन रोगतज्ञ प्रो. फॅन चुंग यांच्यामते फुप्फुस, किडनी, डायबिटीस आणि अस्थमाचा आजार असलेल्या लोकांमध्ये संक्रमणाचा धोका जास्त असतो. अमेरिकेच्या  सेंटर फॉर डिजीज कंट्रोल एंड प्रिवेंशन यांनी दिलेल्या अहवालानुसार मृत्यू झालेल्या लोकांमध्ये महिलांपेक्षा पुरूषांचं प्रमाण जास्त होतं. ( हे पण वाचा -CoronaVirus : कोरोनाच्या महामारीमुळे लोकांमध्ये झाले आहेत 'हे' बदल)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHealthआरोग्य