कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे आणि कोरोनाबाधितांचे प्रमाणही वाढत आहे. या काळात आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला जात आहे. आयुष मंत्रालयानेही कोरोनापासून (कोविड-१९) बचाव करण्यासाठी आयुर्वेदातील काही उपायांचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे. उपचारांपेक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजना महत्त्वाच्या असल्याचे यात अधोरेखित करण्यात आले आहे.
आयुर्वेद हा भारतीय वैद्यकशास्त्राचा पाया मानला जातो. यामध्ये दिनचर्या आणि ऋतुचर्येला महत्त्व देण्यात आले आहे. याच आयुर्वेदाचा आधार घेऊन संसर्गजन्य आजारांपासून बचाव करण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. दररोजच्या वेळापत्रकात काहीसा बदल आणि आरोग्याबाबतची जनजागृती आपल्याला निरोगी राहण्यास मदत करेल, असा विश्वास आयुर्वेदतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.सल्ला महत्त्वाचा संसर्गजन्य व्याधींचाप्रादुर्भाव होत असताना रोगप्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी गुळवेल, आवळा, पिंपळी, हिरडा, हळद या वनस्पतींचा आपल्या वैद्यांच्या सल्ल्याने योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात वापर करावा. दोन चमचे धणे, एक चमचा जिरे, दोन मिरे घेऊन दोन कप पाण्यात उकळावे. आटवून एक कप पाणी गाळून घ्यावे. या काढ्यात थोडी खडीसाखर घालावी. दोन पारिजातकाची पाने आणि चार तुळशीची पाने दोन कप पाण्यात घालून उकळावी. हा काढा रोज घ्यावा. जेवणामध्ये सैंधव मिठाचा वापर करावा. स्नानापूर्वी संपूर्ण शरीराला तिळाचे तेल, शेंगदाणा तेल किंवा खोबरेल तेल लावावे. नंतर गरम पाण्याने आंघोळ करावी. आपल्या वयानुसार, प्रकृतीनुसार वैद्यांच्या सल्ल्याने प्रतिमर्ष नस्य करावे. - डॉ. लीना बावडेकर, आयुर्वेदतज्ज्ञसोपे उपायशरीराची नैसर्गिक संरक्षणप्रणाली टिकवून ठेवण्यासाठी दिवसभर गरम पाणी प्यावे, दररोज किमान अर्धा तास योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणेवर भर द्यावा, दररोजच्या स्वयंपाकात हळद, जिरे आणि लसणाचा वापर करावा, असे सोपे उपाय आयुष मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या माहितीपत्रकात नमूद करण्यात आले आहेत.अशी वाढवा रोगप्रतिकारशक्ती1) सकाळी उठल्यावर दोन चमचे च्यवनप्राश खावे.2)गवती चहा प्यावा किंवा तुळस, दालचिनी, काळी मिरी, सुंठ, गूळ यांचा काढा करून सकाळी प्यावा.3) दिवसातून एकदा किंवा दोनदा दूध-हळद यांचे सेवन करा.हे करून तर पाहा
- सकाळी आणि संध्याकाळी नाकात दोन थेंब तिळाचे, खोबरेल तेल किंवा तूप घालावे.
- घशात खवखवत असल्यास पुदिना पाने किंवा ओवा उकळत्या पाण्यात घालून त्याची वाफ घ्यावी.
- लवंगपूड आणि मधाचे मिश्रण दिवसातून दोन-तीन वेळा घेतल्याने कफाचा त्रास कमी होतो.
- खोकला, घशातील खवखव अशा परिस्थितीत डॉक्टरांशी संपर्क साधावा.
- या उपायांमुळे कोरोनाशी लढा देणे सोपे आहे.
अहो आर्श्चयम् ! अनेक जण उपचार न घेताच होतात बरेताप, सर्दी आणि कोरडा खोकला ही या आजाराची सामान्य लक्षणे आहेत. काही रुग्णांना श्वसनास त्रास होतो. अंगदुखी, घसा खवखवणे किंवा अतिसार अशी लक्षणे जाणवतात. ही लक्षणे सहसा सौम्य असतात. बहुतेक लोकांमध्ये म्हणजे सुमारे ८० टक्के लोकांमध्ये हा आजार सौम्य प्रकारचा असतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अनेक जण विशेष उपचार न घेता स्वत:मधील रोगप्रतिकारकशक्तीच्या जोरावर या आजारापासून बरे होतात. म्हणूनच आजारापासून लढायचे तर गरज असते ती रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्याची.