नवी दिल्ली - गेल्या सहा महिन्यांपासून संपूर्ण देशात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना विषाणूच्या फैलावाचा जोर आता ओसरत असल्याचे दिसू लागले आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशभरात तब्बल एक लाख रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. तर कालच्या दिवसभरात नव्या रुग्णांच्या संख्येतही मोठी घट दिसून आली आहे. काल दिवसभरात देशामध्ये कोरोनाचे ७५ हजार ०८३ नवे रुग्ण सापडले आहेत.आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार काल देशभरामध्ये कोरोनाचे ७५ हजार ०८३ नवे रुग्ण सापडले. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५५ लाख, ६२ हजार ६६३ एवढी झाली आहे. तर या २४ तासांत एक हजार ५३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा ८८ हजार ९३५ एवढा झाला आहे.
coronavirus: रेकॉर्डब्रेक, भारतात २४ तासांत तब्बल एक लाख रुग्ण कोरोनामुक्त, नव्या बाधितांच्या संख्येतही मोठी घट
By बाळकृष्ण परब | Published: September 22, 2020 11:14 AM
देशात सुरू असलेला कोरोना विषाणूच्या फैलावाचा जोर आता ओसरत असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
ठळक मुद्दे काल दिवसभरात तब्बल एक लाख एक हजार ४६८ रुग्णांनी केली कोरोनावर मात देशातील एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ४४ लाख ९७ हजार ८६७ एवढी झाली आहेदेशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या घटून ९ लाख ७५ हजार ८६१ एवढी झाली आहे