(image Credit- Getty images)
साधारणपणे डोळ्यांमधून पाणी येणं किंवा वेदना जाणवणं ही सामान्य समस्या आहे. लोकांना वाटतं की टिव्ही, मोबाईल किंवा लॅपटॉप जास्तवेळ वापरल्याने डोळ्याच्या या समस्यांचा सामना करावा लागतो. पण नवीन संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार डोळ्यांमध्ये वेदना जाणवणं हे कोरोना व्हायरसचं प्रमुख लक्षण आहे. हा अभ्यास युके मधील मुळच्या भारतीय असलेल्या प्राध्यापक शाहिना प्रधान यांच्या नेतृत्वात करण्यात आला होता.
शाहिना प्रधान यांनी सांगितले की, ''कोरोना व्हायरस कशाप्रकारे संपूर्ण शरीरावर आक्रमण करतो. युकेमधील एंग्लिया रस्किन यूनिव्हर्सिटीतील संशोधकांनी कोरोना पॉझिटिव्ह लोकांवर एक अभ्यास करून लक्षणांबाबत अभ्यास केला होता. चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना कोणती शारीरिक लक्षणं दिसून आली होती. याबाबत अभ्यास करण्यात आला होता. ''
पुढे त्यांनी सांगितले की,'' हा एक असा अभ्यास आहे. ज्यात डोळ्यांच्या संबंधित लक्षणं आणि कोरोना व्हायरस यांचा संबंध लावण्यात आला होता. याव्यतिरिक्त कोरोनाच्या अन्य लक्षणांच्या तुलनेत डोळ्यामध्ये दिसणारी लक्षणं शरीरात किती दिवसात दिसून येतात याबाबत अभ्यास करण्यात आला होता. हा अभ्यास BMJ Open Ophthalmology पत्रिकेत प्रकाशित करण्यात आला होता.
आनंदाची बातमी! भारतीय शास्त्रज्ञांनी शोधले कोरोनाचे उपचार, नव्या पद्धतीने संसर्ग रोखता येणार
संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार या अभ्यासात सहभागी असलेल्यांनी डोळ्यांच्या समस्या जाणवल्याची माहिती दिली होती. यातील १६ टक्के लोकांना डोळ्यांची लक्षणं जाणवली होती. ५ टक्के लोकांनी सांगितले की त्यांना डोळ्यांचा त्रास आधीपासूनच होता. या अभ्यासात सहभागी असलेल्या १८ टक्के लोकांना फोटोफोबिया तसंच डोळ्यांना न दिसण्याची समस्या जाणवत होती. दरम्यान काही लोकांनी कोरोना व्हायरसचं संक्रमण झाल्यानंतर समस्या वाढल्याचे सांगितले.
हिवाळ्यात शिंका, सर्दीच्या समस्येने हैराण आहात; 'या' घरगुती उपायांनी सायनसची समस्या होईल दूर
या अभ्यासात सहभागी असलेल्या ८३ टक्के लोकांमधून ८१ टक्के लोकांना कोरोनाची लक्षणं दिसायला सुरूवात झाल्यानंतर डोळ्यांच्या समस्यांचा सामना करावा लागला होता. यातील ७० टक्के लोकांना दोन आठड्यांपेक्षा जास्त कालावधी या समस्येचा सामना करावा लागला होता.
प्रधान म्हणाल्या की, "कोविड -१९ च्या संभाव्य लक्षणांच्या यादीमध्ये डोळ्यांच्या समस्येचा समावेश करणे आवश्यक आहे, परंतु डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाला सूक्ष्मजंतूंपासून दूर ठेवणे आवश्यक आहे. हा अभ्यास महत्त्वाचा आहे कारण या माध्यमातून कोविड -१९ डोळ्यांना कसा संक्रमित करू शकतो आणि शरीरात कसा पसरतो हे स्पष्ट होण्यास मदत होते.''