कोरोना व्हायरसच्या महामारीने जगभरात हाहाकार निर्माण केला आहे. कोरोनाचा प्रसार चीननंतर संपूर्ण जगभरासह भारतातसुद्धा झपाट्याने व्हायला सुरुवात झाली आहे. आत्तापर्यंत जगभरात २ लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाच्या संक्रमणामुळे आपाला जीव गमवावा लागला आहे. कोरोनावर लस आणि औषधं शोधण्याासाठी अनेक देशांमध्ये संशोधन केलं जात आहे. अशात कोरोना व्हायरसच्या संक्रमणाबाबत वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. अलिकडे चीनने केलेल्या संशोधनातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे.
चीनच्या शास्त्रज्ञांनी वुहानची काही सार्वजनीक स्थळं आणि २ रुग्णालयांमध्ये संशोधन सुरू केलं होतं. त्यात असं दिसून आलं की हॉटस्पॉटच्या हवेतही कोरोना व्हायरसची अनुवांशिक तत्व होती. तरी या हवेतून संक्रमणाचा धोका असू शकतो की नाही याबाबात माहिती स्पष्ट झालेली नाही. शास्त्रज्ञांनी ३० पेक्षा जास्त ठिकाणाहून ४० नमुने परिक्षणासाठी घेतले होते. वुहान युनिव्हरसिटीच्या शास्त्रज्ञांनी सांगितलं की, शासनाने हॉटस्पॉटचे सॅनिटायजेशन, व्हेडटिलेशन याबाबत काळजी घ्यायला हवी. तसंच गर्दीच्या ठिकाणांपासून लोकांनी लांब राहायला हवं.
आतापर्यंत कोरोना व्हायरसचं संक्रमण फक्त संक्रमित व्यक्तीच्या खोकण्यातून आणि शिंकण्यातून होत असल्याचं दिसून आलं होतं. शास्त्रज्ञांच्या टीमने दोन रुग्णालयाच्या बाहेर हवेच्या नमुन्यांची तपासणी केली. ज्यात असं दिसून आलं की, कमी हवेशीर असलेल्या ठिकाणी आणि वेंटिलेशन नसलेल्या ठिकाणच्या हवेत कोरोना व्हायरस आढळून आला. ( हे पण वाचा-लॉकडाऊनमध्ये तुमचं पोट साफ होत नाही का? 'या' उपायांनी पोटाच्या तक्रारी होतील दूर)
गर्दीच्या ठिकाणी कोरोनाचं संक्रमण जास्त
या संशोधनात दिसून आलं की ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त गर्दी असते. अशा रुग्णालयांच्या आसपासच्या परिसरात व्हायरसचे जास्त अंश दिसून आले. आरोग्य विभागाचे कर्मचारी ज्या ठिकाणी आपले सुरक्षा किट काढतात. त्या ठिकाणी कोरोना व्हायरसचे अधिक अंश असतात. हे किट काढल्यानंतर व्हायरसचे अंश हवेत पसरत असल्याचे हे या संशोधनातून दिसून आलं. ( हे पण वाचा- CoronaVirus : समोर आली कोरोनाची ६ नवी लक्षणं, त्यांच्याकडे करू नका दुर्लक्ष)