शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत राडा! ठाकरे-शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, मध्यरात्री वातावरण तापलं!
2
सौदीचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान इस्रायलवर संतापले; म्हणाले, "गाझावरील हल्ला हा..."
3
एलॉन मस्क आणि भारतीय वंशाच्या विवेक रामास्वामींवर ट्रम्प यांनी सोपवली मोठी जबाबदारी, सरकारमध्ये केला समावेश
4
Stock Market Highlights: शेअर बाजारात आजही घसरण; Nifty २३,९०० च्या खाली, सर्व क्षेत्रीय निर्देशांक रेड झोनमध्ये
5
'तुमची ताकद किती समजून जाईल'; गणेश नाईकांसमोरच फडणवीसांचं संदीप नाईकांना सूचक इशारा
6
माझ्याकडे महाराष्ट्राचे सत्यात उतरणारे स्वप्न, माझा कम्फर्ट भाजपसोबत; राज ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका
7
आजचे राशीभविष्य - १३ नोव्हेंबर २०२४, लाभदायी दिवस, नोकरीत यश मिळेल, घरातील वातावरण सुखद राहील
8
NTPC Green IPO च्या प्राईज बँड आणि तारखेची माहिती आली समोर, पाहा संपूर्ण डिटेल्स
9
'यारिया' फेम सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता चढला बोहल्यावर, दिल्लीतील मंदिरात केलं थाटामाटात लग्न
10
Maharashtra Election 2024 Live Updates: राज ठाकरे यांची आज वरळीत दुसरी जाहीर सभा, कोणावर साधणार निशाणा?
11
मुक्ता बर्वे कलर्स मराठीवरील 'या' मालिकेत साकारणार आगळीवेगळी भूमिका; प्रोमो बघाच
12
LIC नं Tata Group मधील 'या' कंपनीतील हिस्सा विकला, शेअर जोरदार आपटला
13
झारखंडमध्ये आज मतदान,  १० राज्यांत होणार पोटनिवडणूक
14
सलमान खानला पाठवले धमकीचे मेसेज! पोलिसांनी युवा गीतकाराला ठोकल्या बेड्या; समोर आलं मोठं कारण
15
मराठा समाजाची कांड्यांवर मोजण्याइतकी आहेत मतं; भाजपच्या बबनराव लोणीकरांचे वादग्रस्त वक्तव्य
16
आजचा अग्रलेख: भुजबळ ‘सीएम’ का झाले नाहीत?
17
शिवाजी पार्कवर उद्धवसेना, मनसेची सभा होणार?; नगरविकास खात्याच्या निर्णयाकडे लक्ष
18
जगातले दुश्मन एकत्र येतात तर आम्ही एकत्र येण्यावर चर्चा तर हवी; 'लोकमत'च्या मुलाखतीत राज ठाकरेंचं वक्तव्य
19
२० वर्षांत मतदार नेमके कुणाकडे गेले? २००४ ते २०१९ मध्ये काय घडलं?; जाणून घ्या आकडेवारी
20
२ हजारांहून अधिक मतदार सध्या कामानिमित्त परदेशात

काळजी वाढली : कोरोना रुग्णांमध्ये 'या' आजाराचा धोका सातपट; अमेरिकेतील संशोधनातून माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 5:25 AM

Bells Palsy : कोरोनाचा धोका कायम असतानाच बेल्स पाल्सी या आजाराचा धोका समोर आला आहे.

ठळक मुद्देकोरोनाचा धोका कायम असतानाच बेल्स पाल्सी या आजाराचा धोका समोर आला आहे.

नवी दिल्ली : कोविड-१९ संसर्गाच्या तिसऱ्या लाटेची टांगती तलवार कायम असतानाच आता ‘बेल्स पाल्सी’ या आजाराचा धोका समोर आल्यामुळे लोकांमध्ये नवी भीती निर्माण झाली आहे.

जगातील कोविड-१९ बाधितांचा आकडा १८ कोटींच्या वर गेला आहे. लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला. या विषाणूला रोखण्यासाठी जगभरातील सरकारे शर्थीचे प्रयत्न करीत असतानाच काळी बुरसी (ब्लॅक फंगस) आणि डेल्टा प्लस यांचे संकट आले. त्यापाठोपाठ आता बेल्स पाल्सीचे रुग्ण आढळल्याने सर्वांच्याच चिंता वाढल्या आहेत. ‘बेल्स पाल्सी’ म्हणजे चेहऱ्याचा अर्धांगवायू किंवा ‘लकवा’ होय. कोरोना रुग्णांमध्ये बेल्स पाल्सीचा धोका सातपट अधिक असल्याचे दिसून आले आहे.

माध्यमांत प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार, अमेरिकेच्या ओहियो प्रांतातील क्लेव्हलँड शहरातील केस वेस्टर्न रिझर्व्ह विद्यापीठात यासंबंधीचे संशोधन करण्यात आले. विद्यापीठातील युनिव्हर्सिटी हॉस्पिटल्स क्लेव्हलँड मेडिकल सेंटर आणि केस वेस्टर्न रिझर्व्ह युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसीन या दोन संस्थांनी केलेल्या नव्या संशोधनात कोरोनाच्या १ लाख रुग्णांपैकी ८२ जणांना बेल्स पाल्सी विकार झाल्याचे संशोधनात आढळून आले आहे. कोरोना लस घेतलेल्या १ लाख लोकांपैकी फक्त  २० जणांना हा त्रास झाला आहे. काय आहे बेल्स पाल्सी?बेल्स पाल्सी हा शरीरातल्या स्नायूंशी निगडित असलेला अर्धांगवायूसदृश विकार आहे. अर्धांगवायूमध्ये अर्धे शरीर निकामी होते. बेल्स पाल्सीमध्ये चेहऱ्याची एक बाजू लुळी होते. रुग्णाला गाल फुगवण्यास, गालाची हालचाल करण्यास त्रास होतो. याचा डोळ्यांच्या पापण्यांवर आणि भुवयांवरही परिणाम होतो. 

डोळ्यांच्या पापण्या मिटलेल्या राहतात. हा विकार होण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, उच्च रक्तदाब, मधुमेह तसेच काही गंभीर आजारांत बेल्स पाल्सीचा सर्वाधिक धोका असतो. संशोधकांच्या मते, हा त्रास उद्भवल्यावर दोन महिन्यांत यावर योग्य उपचार करण्यात आले, तर हा विकार बरा होऊ शकतो. यातून बाहेर येण्यासाठी ६ महिन्यांचा कालावधीही लागू शकतो.

डेल्टा व्हेरिएंटचा धोकाअमेरिका, भारत आणि ब्राझीलमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. भारतात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने जगभरातील देशांच्या चिंता वाढविल्या आहेत. अनेक देशांमध्ये या व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढू लागली आहे. आतापर्यंत तब्बल १०० देशांमध्ये डेल्टा व्हेरिएंट आढळल्याची माहिती समोर आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाInternationalआंतरराष्ट्रीयBrazilब्राझीलIndiaभारत