कोरोना व्हायरस भारतात जास्त प्रमाणात पसरू नये यासाठी खबरदारी बाळगली जात आहे. चीनमधून जगाच्या सर्व भागात पसरत असलेल्या या आजारासाठी अद्याप कोणतेही औषध उपलब्ध नाही. अशा गंभीर परिस्थितीत कोरोना व्हायरसने इन्फेक्टेट असलेल्या रुग्णांना एचआईव्हीच्या आजारासाठी वापरात असलेली औषध दिली जात आहेत. या महाभयंकर व्हायरसमुळे मृत्यू होत असलेल्या लोकांची संख्या ८० पेक्षा जास्त आहे.
तसंच इन्फेक्शन झालेल्या लोकांची संख्या २ हजारांवर पोहोचली आहे. इन्फेक्शन झालेल्या लोकांमध्ये ४६१ रुग्ण हे गंभीर स्थितीत आहेत. चीनमध्ये हा व्हायरस पसरल्यानंतर भारत, अमेरिकासहीत अनेक देशांमध्ये सार्स व्हायरससाठी अलर्ट जारी केला आहे. ( हे पण वाचा-२५ ते 3५ या वयोगटातील तरूण होताहेत 'या' गंभीर आजाराचे शिकार, वेळीच व्हा सावध...)
सार्स व्हायरसने इन्फेक्शन होत असलेल्या या व्हायरसला चीनमध्ये रोखण्यासाठी एड्स या आजारात रुग्णांना दिले जात असेलेले AbbVie Inc हे औषध दिलं जात आहे. हा आजार असा आहे ज्यात कोणत्याही प्रकारचे एंटी वायरल औषध आणि लस देऊन सुद्धा रूग्णाची स्थिती बरी होत नाही. रूग्णांना या व्हायरस पासून वाचवण्यासाठी लोपिनेविर आणि रिटोनेविर यांच्या मिश्रणाने तयार केलेले AbbVie हे औषध दिले जात आहे. गोळ्यांच्या स्वरूपात हे उपलब्ध आहे. हा वायरस चीनमध्ये झपाट्याने पसरत आहे. चीनच्या बीजींग शांघाई, मकाओ आणि हॉंंगकॉंंग या ठिकाणी हा आजार पसरत आहे. ( हे पण वाचा-आजारांना मुळापासून नष्ट करणारं फोन कव्हर, जाणून घ्या काय आहे याची खासियत?)
चीनच्या राष्ट्रीय स्वास्थ आयोगाच्या म्हणण्यानूसार हा वायरस संक्रमीत होण्यासाठी १० दिवस लागतात. लोपिनेविर आणि रिटोनेविर यांचा वापर करून या आजारांवर नियंत्रण मिळवलं जात आहे. दुसरीकडे तज्ञ या वायरसशी निगडीत औषध शोधत आहेत. या आजारात एक गोष्ट जाणवते ती म्हणजे या आजाराची लक्षणं रुग्णांमध्ये लगेच दिसून येत नाहीत. त्यामुळे इन्फेक्शन झालेल्या व्यक्तीला ओळखणं कठीण होत आहे.