राजधानी दिल्लीत कोरोना व्हायरसच्या संक्रमणाने कहर केला आहे. कोरोनाच्या तिसर्या लाटेची चर्चा सुरू आहेत. एम्सचे संचालक डॉ. गुलेरिया यांनी याला स्पष्टपणे नकार दिला आहे. आजतकशी झालेल्या चर्चेदरम्यान तिसरी लाट नसून दुसरी लाट सध्या तीव्र झाल्याचे सांगितले आहे. मास्कचा वापर योग्य पद्धतीने न करणं, सोशल डिस्टेंसिंगचे पालन न करणं ही यामागची मुख्य कारणं असल्याचेही ते म्हणाले. डॉ. गुलेरिया यांनी हवामान आणि प्रदूषणालाही वाढत्या संक्रमणासाठी जबाबदार ठरवलं आहे.
प्रदूषणामुळे विषाणू जास्त काळ हवेमध्ये राहतात. प्रदूषण आणि व्हायरस दोन्ही फुफ्फुसांवर परिणाम करतात. कोरोना विषाणूचा प्रसार अद्याप आटोक्यात आलेला नाही. युरोप आणि इतर देशांचे उदाहरण देत डॉ. गुलेरिया म्हणाले की, ''मास्कचा वापर करायला हवा. आवश्यक काम नसल्यास घराबाहेर जाऊ नये. जर व्हायरसपासून बचावसाठी खबरदारी घेतली नाही तर कोरोनाचा प्रसार अजून वाढू शकतो. तरूणाई या व्हायरसच्या प्रसाराबाबत जास्त गंभीर नाही. अनेकजण निष्काळजीपणा करताना दिसून येत आहे. तरूणांना वाटतं की सौम्य संक्रमण झाल्यास घाबरण्याचे कारण नाही. त्यांच्या माध्यमातून घरातील वृद्धांपर्यंत संक्रमण पोहोचत आहे. ''
कोरोनाची लस मिळेल अशी आशा व्यक्त करत डॉ. गुलेरिया म्हणाले की, ''काही नवीन औषधेही यायला हवीत, ज्यामुळे कोरोनावर चांगले नियंत्रण मिळवता शकते. लस आल्याने कोरोना व्हायरसचे रुग्ण कमी होण्यास मदत होऊ शकते. इन्फ्लूएन्झा, फ्लूची लस घेतल्यास कोरोनाचा पूर्णपणे प्रतिबंध होईल, हा एक गैरसमज आहे. ही लस इन्फ्लूएन्झा विरूद्ध प्रभावी आहे. पण कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी सोशल डिस्टेंसिंग आणि मास्कचा वापर करणं आवश्यक आहे.''
प्रदूषण आणि कोरोनाच्या दुहेरी संकटाबद्दल एम्सचे संचालक म्हणाले की, ''जोपर्यंत गरज नाही तोपर्यंत बाहेर जाऊ नका. जर जाणे आवश्यक असेल तर मास्कचा वापर करा आणि सोशल डिस्टेंसिंग पाळा. सुर्यप्रकाशात बाहेर पडा. कोरोना संक्रमणाच्या रुग्णांमध्ये घट होत आहे. दिवाळीपर्यंत कोरोनाच्या रुग्णांमध्ये अशीच घट पाहायला मिळाली तर कोरोनाची माहामारी नष्ट होण्यास मदत होऊ शकते.'' मोठा दिलासा! येत्या डिसेंबरमध्ये कोरोनाची लस येणार?; आदर पुनावालांनी सांगितले की....
दुसऱ्यांदाही होऊ शकतं कोरोनाचं संक्रमण
दिवाळी आणि छठपूजा यांबाबत बाोलताना यांनी सांगितले की, ''गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा. आरोग्याची काळजी घेऊन सण उत्सव साजरे करा. सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांना पुन्हा इन्फेक्शन होण्याचा धोका असू शकतो. रोग प्रतिकारशक्ती कमी होऊ लागली तर पुन्हा संसर्ग होण्याचा धोका आहे. काही लोकांची प्रतिकारशक्ती तीन ते चार महिन्यांनंतर हळूहळू कमी होऊ लागते. अशा परिस्थितीत संरक्षण किती काळ राहील हे सांगणे कठीण आहे.'' ७ महिन्यांपासून लांब होतं लेकरू; बापानं ३७ तास स्कूटर चालवून चिमुरड्यासाठी गाव गाठलं