गेल्या काही दिवसात कोरोनाच्या केसेस कमी तर झाल्या पण अजूनही देशभरात दोन लाखांपेक्षा जास्त कोरोना रूग्ण आढळून येत आहेत. तर मृत्यू होणाऱ्यांच्या आकडेवारीत चढउतार होत आहे. संक्रमण रोखण्यासाठी वेगवेगळे नियम करण्यात आले आहेत आणि तज्ज्ञांकडून लोकांना सतत आवाहन केलं जात आहे की, घरातून बाहेर पडताना मास्क चांगल्या प्रकारे लावा. सध्या डबल मास्किंगवर जास्त जोर दिला जात आहे. चला जाणून घेऊन कशाप्रकारे योग्य डबल मास्किंग करायचं.
डबल मास्किंगचा अर्थ होतो दोन मास्क लावणे. पण यातही काहींना असा प्रश्न पडतो की, कोणते दोन मास्क लावायचे. जेणेकरून संक्रमणापासून बचाव होईल. कारण मास्क तर वेगवेगळ्या प्रकारचे असतात. जसे की, सर्जिकल मास्क, कॉटन मास्क, एन-९५ मास्क. (हे पण वाचा : Coronavirus: कोरोना रुग्णाच्या मृतदेहापासून संक्रमणाचा धोका किती वेळ राहतो? AIIMS च्या रिपोर्टमधून खुलासा)
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ट्विटच्या माध्यमातून सांगितलं आहे की, डबल मास्किंग कसं करावं. याची योग्य पद्धत काय आहे? मंत्रालयाने सल्ला दिला आहे की, डबल मास्किंगसाठी आधी सर्जिकल मास्क लावावा आणि त्याच्यावर आणखी एका टाइट फिटिंग असलेल्या कपड्याचा मास्क लावावा.
सर्जिकल मास्क नसेल तर काय?
माहिती आणि प्रसारण मंत्रालयानुसार, जर तुमच्याकडे सर्जिकल मास्क नसेल तर एकत्र दोन कॉटन मास्क तुम्ही लावू शकता. बरेच लोक सर्जिकल मास्क वापरतात. लोक हा मास्क धुवून पुन्हा वापरतात. पण सरकारनुसार, सर्जिकल मास्क धुवून पुन्हा वापरू नये. कारण हा मास्क केवळ एक वेळ वापरण्यासाठी तयार केलेला असतो.
मंत्रालयाने सांगितलं की, सामान्यपणे सर्जिकल मास्कचा एकदाच वापर करावा. पण जर तुम्ही त्याला डबल मास्किंगसाठी वापरत असाल तर त्याचा तुम्ही पाच वेळाही वापर करू शकता. यााठी तुम्ही तो मास्क एकदा वापरून सात दिवसांसाठी उन्हात ठेवा. त्यानंतर तो मास्क तुम्ही पुन्हा डबल मास्किंगसाठी वापरू शकता.