कोरोनापासून बचावासाठी जास्तीत जास्त लोक घरात थांबत आहेत. एसी कुलरच्या हवेत आपला वेळ घालवत आहेत. पण घरी राहून कोरोना व्हायरसपासून बचाव केला जाऊ शकतो का? याबाबत तज्ज्ञ काय सांगतात. हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तज्ज्ञांच्यामते कोरोनाचा धोका घराबाहेरच नाही तर घरात सुद्धा अधिक तीव्रतेने जाणवू शकतो.
बंद जागेत किंवा व्हेंटिलेशन कमी असलेल्या ठिकाणी कोरोनाचा प्रसार वेगाने होतो. लिफ्टसारख्या लहानश्या जागेतही संक्रमण मोठ्या प्रमाणात पसरू शकते. अमेरिकेतील वेंडरबिल्ट युनिव्हरसिटीतील संक्रामक रोगतज्ज्ञ प्राध्यापक विलियम शेफनर यांनी दिलेल्या माहितीनुसार हवा नसलेल्या ठिकाणी थांबल्यास कमी वेळातच व्हायरसचा संसर्ग होऊ शकतो.
साधारणपणे घराच्याबाहेर व्हायरसचा धोका कमी असतो. कारण नैसर्गिक हवा आणि लोकांपासून लांब राहता येतं. शरीराला पुरेसा ऑक्सिजन पुरवठा होतो. द जर्नल ऑफ इनफेक्शियस डिजीजच्या एका अभ्यातून दिसून आलं की, सुर्याच्या संपर्कात आल्यानंतर कोरोनाचे विषाणू काही प्रमाणात निष्क्रिय होतात. अनेक तज्ज्ञांनी उन्हामुळे कोरोना नष्ट होऊ शकेल असा दावा केला होता. पण WHO ने कोरोना विषाणूवर तापमानाचा परिणाम होत नसल्याचे स्पष्ट केले आहे.
आरोग्यतज्ज्ञांनी शारीरिक आणि मानसिक ताण-तणावातून बाहेर येण्यासाठी खेळणं, धावणं, सायकल चालवणं अशा फिजिकल एक्टिव्हिटीज महत्वाच्या असल्याचं सांगितले आहे. एसी किंवा रुममध्ये चांगलं व्हेंटिलेशन नसल्यामुळे कोरोनाचा प्रसार होऊ शकतो. चीनच्या एका रेस्टॉरंटमध्ये एसीमुळे कोरोनाचा विषाणू पसरल्याची घटना घडली होती. खोकला किंवा शिंकण्यातून, बोलताना ड्रॉपलेट्स एसीच्या हवेमार्फत संपूर्ण परिसरात पसरू शकतात. अशा घटना सावर्जनिक ठिकाणी घडण्याची शक्यता जास्त असते.
न्यूयॉर्कच्या Mount Sinai Health System चं म्हणणं आहे की, घरातील एखादी व्यक्ती कोरोना विषाणूंनी संक्रमित असेल तर सावधगिरी बाळगायला हवी. कोरोना व्हायरसचे लहान कण एसी किंवा पंख्यामार्फत पसरतात त्यामुळे संसर्ग होऊ शकतो. तज्ज्ञांच्यामते घरातील खिडक्या उघड्या ठेवल्यामुळे व्हायरसचे कण बाहेर निघून जाण्यास मदत होते.
घरातील पडदे उघडून काहीवेळ ताजी हवा घरात येऊ दिल्यास संक्रमणाचा धोका कमी होऊ शकतो. याशिवाय घरात असताना सतत तोडांला हात लावू नका, सतत साबणाने हात स्वच्छ धुवा. मास्क लावणं, सोशल डिस्टेंसिंगचं पालन करणं अशा नियमांमुळे कोरोनापासून स्वतःला लांब ठेवता येईल.
सतत मास्क लावल्यानंतर घाम आणि गुदमरण्याची समस्या उद्भवते? मग 'हे' वाचाच
सर्दी, खोकलाच नाही; तर विषाणूंच्या संसर्गापासूनही लांब राहाल, जर १ ग्लास हळदीचे पाणी प्याल