(Image Credit : www.nami.org)
काही प्रमुख डॉक्टरांनी कोरोना रूग्णांबाबत चिंता व्यक्त करत सांगितले की, गंभीर रूपाने आजारी होणाऱ्या कोरोना रूग्णांची PTSD म्हणजेच पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डरची स्क्रीनिंग करणं गरजेचं आहे. PTSD एक अशी मानसिक स्थिती आहे ज्यात सामान्यपणे एखादी दुर्घटना किंवा फार वाईट स्थितीचा सामना केल्यावर रूग्णात बघायला मिळते.
ब्रिटनच्या युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधील एक्सपर्ट्सच्या नेतृत्वात तयार करण्यात आलेल्या कोविड ट्रॉमा रेस्पॉन्स वर्किंग ग्रुपने कोरोनामुक्त रूग्णांबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, कोरोनाने गंभीर रूपाने आजारी ज्या रूग्णांवर आयसीयूमध्ये उपचार केले जातात. त्यांना PTSD चा सर्वाधिक धोका आहे.
(Image Credit : thestressoflife.com)
बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार, एक्सपर्ट्सचं सांगणं आहे की, गंभीर रूपाने आजारी पडणाऱ्या हजारो लोकांना PTSD पासून धोका असेल. यासाठी डॉक्टरांनी याआधीच्या रिसर्चचा हवाला दिला. ज्यातून समजतं की, महामारीमुळे गंभीर रूपाने आजारी पडलेल्या 30 टक्के लोकांमध्ये PTSD ची स्थिती डेव्हलप झाली होती. तसेच ड्रिपेशन आणि चिंता एक मुख्य समस्या ठरली होती.
कोरोनाने आजारी ट्रेसी नावाच्या एका महिलेवर तीन आठवडे हॉस्पिटलमध्ये उपचार चालले. एक आठवडा ती आयसीयूमध्ये राहिली. ट्रेसी म्हणाली की, 'ती स्थिती नरकासारखा होती. मी लोकांना मरताना पाहिलं. स्टाफने मास्क घाललेले होते. तुम्ही केवळ त्यांचे डोळे बघू शकता. तिथे फार एकटेपणा आणि भीतीदायक स्थिती होती'. आता सुट्टी मिळून एक आठवडा झाल्यावरही ट्रेसीला झोपण्यात समस्या येत आहे आणि तिला सतत मरणाचे विचार येतात.
ब्रिटनच्या कोविड ग्रुपमध्ये सहभागी मानसोपचारतज्ज्ञ मायकल ब्लूमफिल्ड सांगतात की, ज्या रूग्णांनी हॉस्पिटलमध्ये वेळ घालवला आहे. त्यांना फार भीतीदायक स्थितीचा सामना करावा लागू शकतो. त्यांना बराच काळ समस्या होऊ शकते. तणावाशी संबंधित समस्यांचा त्यांना सामना करावा लागेल.
ब्रिटनमधील प्रमुख आरोग्य एजन्सी एनएचएसकडून सांगण्यात आले आहे की, हॉस्पिटल उपचारानंत ठीक झालेल्या रूग्णांना फॉलोअपसाठी बोलवलं जाईल. तसेच त्यांना मानसोपचार सपोर्टही दिला जाईल.
CoronaVirus: कोरोनाची तीन नवीन लक्षणं आली समोर, CDCने अपडेट केली यादी
काळजी वाढली! लस निष्क्रीय ठरण्याचं कारण असू शकतं कोरोना विषाणूंचं बदलतं स्वरुप
Coronavirus : चिंताजनक! 'या' लोकांना रिकव्हरीनंतरही पुन्हा होऊ शकते कोरोनाची लागण, वाचा कारण...