शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत? 'हे' यावेत किंवा 'ते' यावेत; पण...
2
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
3
दगाफटका टाळण्यासाठी काँग्रेसकडून खबरदारी, विदर्भातील आमदारांन विशेष विमानाने सुरक्षित ठिकाणी हलवणार
4
निवडणुकीत डिपॉझिट वाचवण्यासाठी उमेदवारांना किती मतांची गरज असते?; जाणून घ्या सविस्तर
5
मणिपुरात आमदाराच्या घरातून दीड कोटीचे दागिने लुटून नेले; जमावाने केली नासधूस
6
यशस्वीचा ऑस्ट्रेलियातील पहिला डाव अयशस्वी! टीम इंडियाचा युवा हिरो स्टार्कसमोर ठरला झिरो (VIDEO)
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कामात यशस्वी व्हाल, आर्थिक लाभ होण्याची शक्यता!
8
Zomato च्या झीरो सॅलरी ऑफरमध्ये नवा टर्न; बॅकफायरनंतर दीपिंदर गोयल यांनी आता काय केल?
9
जगभर : सौदी अरेबियाने १०१ परदेशी नागरिकांना लटकवलं फासावर!
10
याला म्हणतात संस्कार! कैलाश खेर समोर येताच गौरव मोरे पडला पाया, अभिनेत्यावर होतोय कौतुकाचा वर्षाव
11
IND vs AUS : बुमराहच्या नेतृत्वाखाली या दोन नव्या चेहऱ्यांना मिळाली पदार्पणाची संधी
12
‘ती’ वादग्रस्त विधाने आयोगाच्या रडारवर; केंद्रीय मुख्य आयुक्तांनी मागवले अहवाल
13
सत्ता आमचीच! सत्ताधारी महायुती आणि विरोधी मविआच्या नेत्यांचे दावे 
14
करवीर ते कुलाबा 40 टक्के मतांचे अंतर; असे का ते समजून घ्या!
15
टक्क्याचा धक्का कुणाला? निवडणुकीत मतदारांमध्ये सुप्त लाट
16
बीड जिल्ह्यात मतदान केंद्र फोडले; ४० जणांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल
17
दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानमध्ये ५० ठार; मृतांमध्ये आठ महिला, पाच लहान मुलांचा समावेश
18
Maharashtra Vidhan Sabha ELection 2024: मुंबईत कोणत्या शिवसेनेसाठी मतटक्का वाढला?
19
विशेष लेख: कट्टर उजवे आणि वादग्रस्त - ऑल द प्रेसिडेंट्स मेन....
20
अदानींवर अमेरिकेत लाचप्रकरणी खटला; आरोप निराधार, आम्ही निर्दोष : अदानी

CoronaVirus: ‘कोरोना’साठी वेगळा आरोग्य विमा घ्यावा का?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 4:04 AM

म्हणून यासाठी काही विमा कंपन्यांनी वेगळा कोरोनासाठी विमा सुरू केला आहे. हा विमा घेताना पुढील गोष्टी लक्षात घ्याव्या.

- अमोल अन्नदाते‘कोरोना’साठी जर आपल्याला खासगी रुग्णालयात उपचार घ्यायचे असतील व शासनाने जरी या उपचाराच्या खर्चावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला असला, तरी खासगी रुग्णालयातील काही रुग्णांचा खर्च ५ लाखांपर्यंत ही गेला आहे. याचे कारणही तसेच आहे. जर कोरोनाचा रुग्ण अत्यवस्थ झाला व त्याला महागड्या औषधांची गरज पडली, तर हा खर्च शासनाने ठरवलेल्या दरात समाविष्ट नाही व रुग्णालयाला वेगळे पैसे आकारावे लागतातच. शिवाय, जर व्हेंटिलेटरची गरज पडली तर खर्च वाढतोच. म्हणून यासाठी काही विमा कंपन्यांनी वेगळा कोरोनासाठी विमा सुरू केला आहे. हा विमा घेताना पुढील गोष्टी लक्षात घ्याव्या.जर आपला आधी काढलेला आरोग्य विमा असेल व याचे प्रीमियम आपण नियमित भरत असाल, तर वेगळ्या कोरोना आरोग्य विम्याची गरज नाही.आरोग्य विमा असल्यास तो प्रत्येक व्यक्तीला किमान ५ लाखांची सुरक्षा देणारा असावा किंवा नसल्यास तो वाढवून घ्यावा. जर आरोग्य विमा नसेल तर वेगळा कोरोना विमा घ्यावा. कोरोना झाल्यास किंवा घरात इतर कोरोनाची जोखीम वाढवणारे आजार असलेली व्यक्ती असल्यास त्यासाठी उपचाराचे आर्थिक नियोजन करून ठेवावे. काही खर्च कमी करून कधीही वापरता येतील, अशी पैशांची तजवीज असावी. कोरोना विमा वार्षिक रुपये १५० पासून ते ५००० पर्यंत उपलब्ध आहे. व यात २५,००० पासून ते ५ लाखांपर्यंत विमा सुरक्षा आहे. यात काही सरसकट पूर्ण ठरवलेली विम्याची रक्कम देण्यात येते, काही विम्यामध्ये भरती होण्याची गरज व खर्चाप्रमाणे देण्यात येते. काही विमा हा तुम्ही काही विशिष्ट दुसऱ्या व तिसºया पातळीची शहरे किंवा ग्रामीण भागात राहात असाल त्यांच्या साठीच आहेत व काही विम्यामध्ये अतिदक्षता विभागात दाखल झाल्यास किंवा व्हेंटिलेटरच गरज पडल्यास विम्याची रक्कम मिळत नाही. म्हणून विमा घेताना या गोष्टींचा खुलासा करून घ्यावा.प्रत्येक विम्याला लागू होण्यास विमा काढल्यापासून १४-१६ दिवसांचा अवधी आहे.बºयाच विम्यामध्ये संपर्क आल्यावर क्वारंटाइन व्हावे लागले तर आजारी पडल्यावर मिळणार त्याच्या ५०% रक्कम दिली जाते. शक्यतो क्वारंटाइनमध्ये ही विमा सुरक्षा देणाºया पॉलिसीची निवड करावी.शक्यतो ज्या विमा कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो म्हणजे म्हणजे क्लेम अंतर्गत पैसे देण्याचे प्रमाण जास्त आहे त्या कंपनीचा विमा घ्यावा. ही सर्व विमा कंपन्यांची माहिती कफऊअक उपलब्ध करून देते.प्रत्येक विम्याचा काळ फक्त१ वर्ष असतो याची नोंद घ्यावी.(लेखक बालरोगतज्ज्ञ असून, वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस