कोरोना व्हायरसचा प्रसार जगभरात दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोना व्हायरस शरीरातील कोणकोणत्या अवयवांवर परिणाम करतो. यामुळे कोणते वेगळे आजार निर्माण होत आहेत, याबाबत जगभरातून नवनवीन गोष्टी समोर येत आहे. अमेरिकेतील अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या एका ३० वर्षीय डॉक्टरांनी मृत्यूचं सगळ्यात मोठं कारण सांगितलं आहे. या डॉक्टरांचं नाव रिचर्ड लेविटन आहे.
कोरोना व्हायरसमुळे उद्भवत असलेल्या निमोनिया आजाराबद्दल लवकर माहिती मिळत नसल्यामुळे रुग्णांना जीवंत ठेवण्यासाठी तातडीने लक्ष द्यायला हवं, कारण कोणतीही लक्षण दिसत नसलेल्या निमोनिया आजारांमुळे लोकांचा मृत्यू होत आहे. न्युयॉर्कमधील अनेक रुग्णांना कोरोनाच्या संक्रमणामुळे निमोनिया झाला होता. अशा रुग्णांना श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. रुग्णांची स्थिती आणि त्याचे होणारे परिणाम याबाबत या डॉक्टरांनी माहिती दिली आहे.
काय आहे सायलेंट हायपोक्सिया
रुग्णांना श्वास घेण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत होता. अशा रुग्णांच्या एक्स रे मध्ये फुप्फुसांमध्ये ऑक्सिजनचा स्तर कमी दिसून आला. निमोनियामुळे रुग्णांच्या शरीरातील ऑक्सिजनचा स्तर कमी झाला होता. त्यामुळे या आजाराला सायलेंट हायपोक्सिया असं म्हटंल जात आहे. यात फुप्फुसांवर फारसा परिणाम होत नसून ऑक्सिजनची कमतरता भासते. रुग्णालयातील निमोनियाचे रुग्ण व्यवस्थित श्वास घेत होते. तर काही मोबाईलचा वापर सुद्धा करत होते. अशा परिस्थितीत जर ऑक्सिजनचा स्तर कमी झाला असेल तर फुप्फुस कार्यरत कशी राहतात. असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ( हे पण वाचा-ज्याच्यामुळे जीव गेले, तोच आता जीव वाचवणार? वटवाघळांवर संशोधन सुरू)
निमोनियाच्या अनेक रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. अशात जभरातील अनेक देशांमध्ये मशिन्सचा अभाव आहे. पल्स ऑक्सिमीटर रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी महत्वाचे ठरू शकतात. सायलेंट हायपोक्सियाची पल्स ऑक्सीमीटरने तपासणी केली जाऊ शकते. याचा वापर थर्मामीटरप्रमाणे सोप्या पद्धतीने करता येतो . ( हे पण वाचा-दात घासताना जीभही करा स्वच्छ; अन्यथा शरीराचं होईल मोठं नुकसान)