कोरोना व्हायरसने गेल्या अनेक महिन्यांपासून जगभरात थैमान घातलं आहे. त्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. आता अनेक देशांमध्ये अनलॉक करण्याला सुरूवात झाली आहे. पण कोरोनाचा प्रसार मात्र थांबलेला नाही. अशा स्थितीत कोरोना व्हायरसची लस लवकरात लवकर उपलब्ध व्हावी यासाठी सर्वत्र प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान भारतातील ३ स्वदेशी लसीच्या शेवटच्या टप्प्यातील चाचण्यांना सुरूवात होत आहे. लसीच्या चाचणीबाबत एक मोठी माहिती समोर येत आहे. भारतात कोरोनाव्हायरसच्या आणखी एका लसीची चाचणी सुरू होणार आहे. या महिन्यात, DCGIने रशियाच्या स्पुतनिक V लसीच्या चाचणीसाठी परवानगी दिली. भारतातील तब्बल १०० स्वयंसेवकांना ही लस दिली जाणार आहे.
डिसीजीआयने यापूर्वी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेडला कोव्हिड-19 लस स्पुतनिक व्हीची दुसर्या आणि तिसर्या टप्प्यातील मानवी चाचण्या घेण्यासाठी परवागनी दिली होती. कंपनीने म्हटले आहे की या लशीला आणि रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडला (RDIF) भारतीय नियंत्रक जनरलकडून (डीजीसीआय) मंजुरी मिळाली होती. कंपनीने म्हटले होते की हा एक नियंत्रित अभ्यास असेल, जो अनेक केंद्रांवर केला जाईल.वृत्तसंस्था स्पुटनिकने दिलेल्या माहितीनुसार तिसऱ्या टप्प्यात पोहचण्यापूर्वी लसीच्या उर्वरित दोन टप्प्यांतील चाचणी करण्यात येणार आहे.
गेल्या आठवड्यात डीसीजीआयच्या तज्ज्ञ समितीने डॉ. रेड्डीच्या लेबोरेटरीजना रशियन कोविड -१९ लस उमेदवार स्पुतनिक व्ही यांच्या टप्प्याटप्प्याने क्लिनिकल चाचण्या घेण्यास परवानगी देण्याची शिफारस केली होती. सरकारी सुत्रांच्या माहितीनुसार १४०० लोक तिसऱ्या टप्प्यात सामिल होऊ शकतात. याआधी फार्मा कंपनी दुसऱ्या टप्प्याची सुरक्षा आणि इम्युनोजेनेसिटीचा डेटा देईल. त्यानंतरच तिसर्या टप्प्यातील चाचणी सुरू होईल. डॉ रेड्डीज आणि RDIF सप्टेंबर मध्ये भारतात लशीचे वितरण करण्यासाठी भागीदारी केली आहे. यानुसार आरडीआयएफ नियामक मान्यतेवर डॉ. रेड्डी लसीचे 10 कोटी डोस पुरवेल. कोरोना काळात तरूणांनाही होऊ शकतो सांधेदुखीचा त्रास; निरोगी राहण्यासाठी तज्ज्ञांनी दिल्या टिप्स
डॉ. रेड्डीजवर सायबर हल्ला
भारताची मोठी फार्मास्युटीकल कंपनी डॉ. रेड्डीजवर मोठा सायबर हल्ला झाला होता. यामुळे कंपनीने जगभरातील कारखान्यांमधील काम थांबविले होते. कंपनीचा डेटा धोक्यात असल्याने सर्व्हरमधील माहिती हल्लेखोरांना न मिळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. कंपनीने स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीत सांगितले की, सायबर हल्ला झाल्याने कंपनीने सर्व डेटा सेंटर आयसोलेट केले होते. Dr Reddy's चे भारत, रशिया, ब्रिटन, अमेरिकेसह ब्राझीलमध्ये कारखाने आहेत. कंपनीवर हा सायबर हल्ला बुधवारी रात्री 2.30 वाजता झाला होता. सावधान! रोजच्या वापरातील 'या' ६ वस्तूंमुळे होऊ शकतो कोरोनाचा संसर्ग, तज्ज्ञांचा दावा