कोरोनाने गेल्या ७ ते -८ महिन्यांपासून जगभरासह भारतातही थैमान घातलं आहे. आता भारतात हिवाळा सुरू होणार असल्यामुळे हिवाळ्यात कोरोनाचा प्रसार वाढणार?, कमी होणार? की आहे त्या स्थितीत राहणार असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. सुपर कम्प्यूटरकडून मिळालेल्या माहितीनुसार व्हायरसच्या प्रसार होण्यासाठी आद्रतेचा खूप मोठं स्थान असते. त्यामुळेच हिवाळ्यात कोरोना व्हायरसचा धोका वाढण्याची शक्यता जास्त असते. याआधीही वैज्ञानिकांनी हिवाळ्यात कोरोनाचा धोका वाढण्याबाबत धोक्याची सुचना दिली होती.
आद्रतेचा परिणाम व्हायरसच्या प्रसारावर होतो. त्यामुळे अशा वातावरणात व्हायरसचा प्रसार होण्याची शक्यता जास्त असते. फुगाकू नावाच्या जपानी सुपर कम्प्यूटरने दिलेल्या माहितीनुसार ६० टक्के आद्रतेच्या तुलनेत हवेत आद्रता कमी झाल्यास व्हायरसच्या कणांचा समावेश वाढण्याची शक्यता असते. या अभ्यासातून दिसून आलं की, खिडकी उघडणं किंवा व्हेंटिलेशन शक्य नसेल तर ह्यूमिडिफायर्सचा वापर करून व्हायरसचा धोका कमी करण्यावर भर दिला जाऊ शकतो. रिकेन आणि कोब युनिव्हर्सिटीकडून हा रिसर्च प्रकाशित करण्यात आला आहे.
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार संक्रमित लोकांच्या माध्यमातून व्हायरसचे कण हवेत पसरतात. फूगाकू सुपर कंम्प्यूटरने याबाबत विश्लेषण केले होते. या अभ्यासात दिसून आलं की, फेस शिल्ड, फेस मास्कप्रमाणे प्रभावी ठरत नाही. या अभ्यासानुसार बंद हॉटेल्समध्ये एकाचवेळी जास्त लोक गेल्यास किंवा एसी सुरू असल्यास कोरोना संक्रमणाचा धोका जास्त असतो. रिकेन आणि कोब युनिव्हर्सिटीकडून याआधीही याप्रकारचं संशोधन करण्यात आलं होतं. त्यातून दिसून आलं की ट्रेनमध्ये प्रवास करत असताना खिडकी उघडल्यास संक्रमणाचा धोका कमी होतो.
कोरोनामुक्त रुग्णांच्या शरीरात किती दिवस राहते रोगप्रतिकारशक्ती
कोरोनामुक्त रुग्णांच्या शरीरात कोविड-१९ विरोधातील रोगप्रतिकारशक्ती किती दिवस राहते हे जाणून घेण्यासाठी अमेरिकी संशोधकांनी सहा हजार कोरोनाबाधितांचे नमुने घेतले होते. त्यामधून कोरोनामुक्त व्यक्तीच्या शरीरात कोरोनाविरोधातील प्रतिकारशक्ती किमान पाच महिन्यांपर्यंत राहते, असे समोर आले आहे. अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ अॅरिझोनामधील भारतीय वंशाच्या असोसिएट्स प्राध्यापक दीप्ता भट्टाचार्य यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन करण्यात आले होते.
या संशोधनादरम्यान, संशोधकांना दिसून आले की, SARC-CoV-2 विरोधात व्यक्तीच्या शरीरात विकसित होणारे प्रतिपिंड (अँटीबॉडी) सुमारे पाच महिन्यांपर्यंत राहतात. प्राध्यापक दीप्ता भट्टाचार्य यांनी सांगितले होते की, SARC-CoV-2 चा संसर्ग झाल्यानंतर शरीरामध्ये पाच ते सात महिन्यांपर्यंत उच्च दर्जाच्या अँटीबॉडी तयार होताना आम्ही स्पष्टपणे पाहिले आहे. धोका वाढला! कोरोनामुळे उद्भवू शकतो कर्णबधिरपणा, तज्ज्ञांच्या दाव्याने वाढवली चिंता
जर्नल इम्युनिटी मध्ये प्रकाशित झालेल्या या रिपोर्टमध्ये भट्टाचार्य यांनी सांगितले की, कोविड-१९ विरोधात रोगप्रतिकारशक्ती दीर्घकाळापर्यंत राहत नसल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आम्ही अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी या अभ्यासाचा विचार केला आहे. त्यात आम्हाला दिसून आले की, शरीरामध्ये रोगप्रतिकारशक्ती विकसित झाल्यानंतर किमान पाच महिन्यांपर्यंत ती टिकते. हे संशोधन प्राध्यापक जान्को निकोलिच जुगिच यांच्याकडून करण्यात आले होते. कोरोनाचा संसर्ग पुन्हा होणार? महाराष्ट्रातील 'या' शहरात Reinfection चे रुग्ण आढळल्याने चिंता वाढली