शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
3
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
5
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
7
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
8
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
9
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
10
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
11
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
13
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
14
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी
15
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
16
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
17
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
18
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
19
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई

Coronavirus: समजून घ्या ‘कोरोना’: नियमित आढळणाऱ्या लक्षणांपेक्षा वेगळी लक्षणे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2020 1:16 AM

ही सर्व लक्षणे सुरुवात असून बऱ्याचदा ताप, खोकला, सर्दी ही यानंतर सुरू होते. म्हणून अशा कुठलीही वेगळी लक्षणे असल्यास लगेच घाबरून जाऊ नये

अमोल अन्नदाते

आपल्याला सर्दी, खोकला, ताप, श्वास घेण्यास त्रास, वास व चवीची क्षमता कमी होणे, जुलाब, उलट्या व श्वास घेण्यास त्रास होणे ही लक्षणे माहीत आहेतच; पण अशी काही वेगळी लक्षणे आहेत, जी कोरोनामध्ये दिसून येत आहेत.यात सर्वात आश्चर्य आहे तापाशिवाय कोरोना. काही डॉक्टर ज्यांना कोरोना संसर्ग झाला त्यांना ताप आलाच नाही व इतर लक्षणे दिसून आली.

  • फक्त तीव्र स्वरूपाची डोकेदुखी.
  • तीव्र पाठदुखी व शरीरातील स्नायू दुखणे, त्यातच पायाचे खालच्या बाजूचे म्हणजे काफ मसल्स दुखणे.
  • फक्त थकवा येणे.
  • डोळे येणे.
  • सर्दी खोकला झालेला माणूस दर वेळी सर्दी खोकला झाल्यावर असतो तसा न राहता खूप जास्त थकल्यासारखा वाटणे व सुस्त वाटणे.
  • ज्येष्ठ व्यक्तींमध्ये झोप जास्त येणे किंवा सकाळी लवकर झोपेतून न उठणे. दिवसाही झोपल्यावर खूप वेळा उठवावे लागणे.
  • सांधेदुखी.
  • दोन दिवसांत तब्येत झपाट्याने बिघडणे व लघवी कमी होणे.
  • थकवा येऊन चेहरा निस्तेज वाटणे.

 

ही सर्व लक्षणे सुरुवात असून बऱ्याचदा ताप, खोकला, सर्दी ही यानंतर सुरू होते. म्हणून अशा कुठलीही वेगळी लक्षणे असल्यास लगेच घाबरून जाऊ नये; पण स्वत:ला इतरांपासून वेगळे ठेवावे व आयसोलेशन करावे. तपासणी अहवाल कदाचित निगेटिव्ह येईल, पण तोपर्यंत स्वत:वर लक्ष ठेवावे व विलगीकरणात राहावे.

(लेखक बालरोगतज्ज्ञ असून, वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्स