शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Coronavirus symptoms: कोरोनाच्या 'या' नव्या लक्षणामुळे डॉक्टरही झाले हैराण, तुम्हीही कराल दुर्लक्ष तर पडेल महागात!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 2:58 PM

Coronavirus : हळूहळू अशी लक्षणे समोर येत आहेत ज्यावर कुणी कधी लक्षच दिलं नाही. खासकरून आवाजात होत असलेल्या बदलाकडे लोक दुर्लक्ष करत आहेत.

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेत अडचणी आणि लक्षणांच्या लिस्टमध्ये वाढ होता दिसत आहे. हळूहळू अशी लक्षणे समोर येत आहेत ज्यावर कुणी कधी लक्षच दिलं नाही. खासकरून आवाजात होत असलेल्या बदलाकडे लोक दुर्लक्ष करत आहेत. मात्र, हे कोरोनाचं लक्षण (Coronavirus Symptoms) असू शकतं. याचा कुणी स्वप्नातही विचार केला नसेल. जर तुम्हालाही तुमचा आवाज कर्कश वाटत (hoarse voice) असेल किंवा काही बदल जाणवत असेल तर तुम्हाला कोरोनाची लागण झाल्याची शक्यता आहे.

भारतात कोविड-१९ च्या केसेसमध्ये वेगाने वाढ होत आहे. मृतांची संख्याही दररोज वाढत आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट अधिक भयावह ठरत आहे. डॉक्टरांनुसार, ताप, खोकला आणि गंध जाणे ही कोरोनाची प्रमुख लक्षणे आहेत. मात्र, आता नवीनही संकेत दिसू लागले आहेत. (हे पण वाचा : लक्षणं असतानाही या ५ कारणांमुळे तुमची कोरोनाची टेस्ट येऊ शकते निगेटिव्ह; वेळीच सावध व्हा)

आवाजात बदल कोरोनाचा नवा संकेत

Times Of India च्या एका रिपोर्टनुसार, कोविड लक्षण अ‍ॅप (COVID Symptom study app) द्वारे देण्यात आलेल्या डेटानुसार, लोकांना कोरोना व्हायरसमुळे त्यांच्या आवाजात बदल झाल्याचं जाणवत आहे. लाखो लोकांनी दिलेल्या डेटातून समोर आलं आहे की, कर्कश आवाज कोविड-१९ चं लक्षण असू शकतं.

अ‍ॅप्लीकेशनच्या मागे असलेल्या टीमनुसार, कर्कश आवाज कोविड-१९ चं एक असामान्य लक्षण आहे. याकडे दुर्लक्ष करू नये. यूकेमध्ये अनेक कर्मचाऱ्यांना कोविड आजाराची सुरूवात झाल्यावर कर्कश आवाज आणि विचित्र आवाजाचा अनुभव आला आहे. (हे पण वाचा : बाहेरून कोणीही आल्यास तुमच्या घरातही होऊ शकतो कोरोनाचा शिरकाव; CDC नं दिल्या गाईडलाईन्स)

हे लक्षण वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये वेगवेगळं असू शकतं. एका रिसर्चनुसार, काही लोकांना आपला आवाज बेढब तर काही लोकांना घोगरा जाणवला. तर मोठ्या आवाजात बोलणाऱ्या लोकांना त्यांचा आवाज हळुवार वाटला आणि आवाजात जडपणा वाटला.

या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

- ताप जर तीन दिवसांपेक्षा जास्त राहत असेल टेस्ट जरूर करा.

- बरेच दिवसांपासून खोकला येत असेल, तर फक्त घरी औषधे घेत बसू नका. लगेच टेस्ट करा.

- घशात खवखव होत असेल तर अजिबात दुर्लक्ष करू नका. औषध घेऊनही बरं वाटत नसेल तर टेस्ट करा.

- उन्हाळ्यातही नाक वाहत असेल किंवा भरत असेल तर कोरोनाची लागण असण्याची शक्यता आहे.

- छातीत वेदना आणि श्वास घेण्यास त्रास होत असेल तर थेट डॉक्टरांशी संपर्क साधा.

- पदार्थांची टेस्ट लागत नसेल किंवा गंध येत नसेल कोरोनाची टेस्ट करा.

आवाजात बदल झाल्यावर का कराल?

अनेकदा सर्दी-खोकला असल्या कारणानेही आवाज बदलण्याची शक्यता आहे. पण या दिवसात आवाजात थोडाही बदल झाला तर दुर्लक्ष करू नका. कोरोनाचं हे लक्षण भलेही हलकं असेल पण जर लक्ष दिलं गेलं नाही तर समस्या वाढू शकते. त्यामुळे जेवढं लवकर शक्य होईल टेस्ट करून घ्यावी.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स