कोरोना व्हायरसचं संक्रमण कसं पसरतं याबाबत अजूनही सगळ्या गोष्टींचा खुलासा झालेला नाही. कोरोनाचे उपाय आणि प्रसाराची कारणं शोधण्यासाठी तज्ज्ञ प्रयत्न करत आहेत. कोरोनाच्या प्रसाराबाबत एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. एका प्रजनन विशेषज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसचं संक्रमण सीमेन म्हणजेच वीर्याच्या माध्यमातूनही पसरू शकतो.
ब्रिटनच्या शेफील्ड जागतिक विद्यापिठातील एंड्रोलॉजीचे प्राध्यापक एलन पेसी यांनी सांगितले की, ''शारीरिक तरल पदार्थांच्या माध्यमातून शरीरात व्हायरस पसरण्याचे पुरावे कमी प्रमाणात आढळून आले होते. पण या सिद्धांताकडे दुर्लक्ष करता येणार नाही. कारण या विषयावर सखोल संशोधन सुरू आहे.'' तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरस अंडकोषात उपस्थित असू शकतो त्यामुळे वीर्याच्या माध्यामातून संक्रमण पसरण्याच्या धोका नाकारता येत नाही.
प्राध्यापक एलन पेसी यांनी फर्टिलिटी, जीनोमिक्स आणि कोरोना व्हायरसवर आधारीत असलेल्या वर्चुअल प्रोग्रेस एज्युकेशनल ट्रस्ट कॉन्फ्रेंसमध्ये सांगितले की, ''कोरोना व्हायरस वीर्याच्या माध्यमातून पसरतो याचे खूप कमी पुरावे आढळून आले आहेत. तरिही पूर्णपणे ही बाब नाकारता येऊ शकत नाही. म्हणून या विषयावर अधिक संशोधन केलं जाणं गरजेचं आहे. ''
प्राध्यापक पेसी यांनी सांगितले की, ''कोरोना संक्रमणाने पुरूषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो याचे खूप कमी पुरावे सापडले आहेत. व्हायरस अंडाकोषात कोणत्याही कारणाशिवाय नुकसान पोहोचवतो अशी उदाहरण याआधी दिसून आली होती. इबोला, जीका आणि डेंग्यू सहित अन्य व्हायरसच्या संक्रमणात असा प्रकार दिसून आला होता. ''
हिवाळ्यात होणारा अंगदुखीचा त्रास असू शकतं कोरोनाचं लक्षणं? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
दरम्यान काही महिन्यापूर्वी चीनी संशोधकांनी केलेल्या दाव्यानुसार कोरोना संक्रमित काही पुरूषांमध्ये सीमन म्हणजेच वीर्यात कोरोना व्हायरस दिसून आला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जर कोरोना व्हायरसने संक्रमित असलेल्या पुरूषांनी शरीर संबंध ठेवले तर त्यांनाही कोरोना संक्रमणाचा सामना करावा लागू शकतो.
कोरोनानंतर 'या' देशात नव्या माहामारीचा कहर; १० राज्यातील लोक आजाराच्या विळख्यात
मीडिया रिपोर्ट्सनी दिलेल्या माहितीनुसार चीनच्या शांगक्यू पालिका रूग्णालयातील कोरोना व्हायरसने संक्रमित ३८ पुरूषांची चाचणी करण्यात आली होती. त्यात सहा रुग्णाच्या वीर्यात कोरोना व्हायरस असल्याचे दिसून आले होते. जामा नेटवर्क ओपन जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या या संशोधनात शरीरसंबंधादरम्यान कोरोना संक्रमणाचा धोका कितपत असतो. याबाबत अधिक स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.