कोरोना विषाणूंच्या संक्रमणामुळे आत्तापर्यंत जगभरात ४ लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तसंच ८ लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. आत्तापर्यंत कोरोनाची लस किंवा औषध शोधण्यात आलेले नाही. जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनाची लस शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या दरम्यान एक सकारात्मक माहिती समोर येत आहे. इंग्लँडच्या शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की, एका स्टेरॉईड औषधाने कोरोनाबाधित व्यक्तीचे उपचार केले जाऊ शकतात. तसंच संक्रमणाची तीव्रता करुन कमी रुग्णांना मृत्यूच्या जाळ्यात अडकण्यापासून वाचवता येऊ शकतं.
माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार त्वचेवरील एलर्जीसाठी वापरात असलेले ‘डेक्झामेथॅसोन' या औषध कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी प्रभावी ठरू शकते. तसंच त्यामुळे मृत्यूंची संख्या कमी होण्यासही फायदेशीर ठरू शकतं. असं दिसून आलं आहे. 'डेक्झामेथॅसोन' हे स्टेरॉइड ‘कोविड-19’ने आजारी असलेल्या रुग्णांना दिल्यास मृत्यूचे प्रमाण एक तृतियांशाने कमी होते, असा निष्कर्ष ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी अभ्यास पाहणीतून काढला आहे.
काय आहे ‘डेक्झामेथॅसोन'
‘डेक्झामेथॅसोन' हे कॉर्टीकोस्टेरॉईड आहे. सामान्यपणे शरीरातील सुज कमी करण्यासाठी या औषधाचा वापर केला जातो. याशिवाय ल्यूपस, रुमेडीएड, आर्थरायटिस आणि मायस्थेनिया यांसारख्या ऑटो इम्यून आजारांवर या औषधाचा वापर केला जातो. शरीरातील सुज कमी करण्यासह रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी हे औषध परिणामकारक ठरते. टीबीची चाचणी केल्यानंतर रुग्णांना ही औषध देण्यात येतात. ही औषध सुरू असताना रुग्णांमध्ये इतर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. ज्यात रक्तदाबासंबधी समस्यांचा समावेश होतो.
या औषधाच्या परिक्षणासाठी २ हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा समावेश करण्यात आला होता. रुग्णांना १० दिवसांपर्यंत ६ मिलिग्राम डेक्सामेथासोनस हे औषध देण्यात आलं होतं. यातून असं दिसून आलं की व्हेंटिलेटरची आवश्यकता भासण्याचे आणि मृत्यूचे प्रमाण कमी झालं होतं. या औषधाच्या वापरानंतर ज्या रुग्णांचे श्वसनासंबंधित आजारांबाबत उपचार सुरू होते. त्यांच्यात सकारात्मक परिणाम दिसून आले होते.
मृत्यूचं प्रमाण ३५ टक्क्यांनी कमी झाले. तर जे रुग्ण ऑक्सिजन सपोर्टवर होते. त्यांचा मृत्यूदर २० टक्क्यांनी कमी झाला होता. रेमडिसवीर या औषधाच्या तुलनेत ‘डेक्झामेथॅसोन' परिणामकारक आहे. WHO ने याबाबात सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या असून मृत्यूदर कमी करण्यासाठी हे औषध परिणामकारक ठरू शकतं असं मत व्यक्त केलं आहे.
चिंताजनक! लस दिल्यानंतरही कमी होणार नाही कोरोना विषाणूंचा धोका, जाणून घ्या कारण