कोरोना व्हायरसच्या माहामारीमुळे संपूर्ण जगभरातील लोकांना संक्रमणाचा सामना करावा लागत आहे. कोरोनाच्या माहामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शास्त्रज्ञांचे संशोधन सुरु आहे. संशोधनातून नवनवीन माहिती समोर येत आहे. त्यातील एक महत्वपूर्ण माहिती म्हणजे कोरोना व्हायरस फक्त श्वसनप्रणालीसाठी नुकसानकारक ठरत नाही तर किडनी, फुफ्फुसं, लिव्हर या अवयवांना सुद्धा व्हायरसच्या संसर्गामुळे नुकसान पोहोचते.
अलिकडे करण्यात आलेल्या संशोधनातून दिसून आले की, कोरोना व्हायरसची लागण होत असलेल्या लोकांना डायबिटीसचा धोका जास्त असतो. तीन देशातील चार युनिव्हर्सिटीजनी या शोधाबाबात माहिती दिली आहे. ब्रिटेनची ग्लासगो युनिव्हर्सिटी आणि बर्मिघम युनिव्हर्सिटी, जर्मनीची होल्सटीन युनिव्हर्सिटी, ऑस्ट्रेलियांतील मोनाश युनिव्हर्सिटीतील संशोधनानुसार कोरोना व्हायरसमुळे इन्सुलिनच्या पेशींवरही परिणाम होत असतो. अनेकदा पेशी नष्ट सुद्धा होतात. अनेक रुग्ण कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर डायबिटीसचे शिकार झाले आहेत.
मेडिकल रिसर्च जर्नल नेचरमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनातून आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार सुरूवातील ज्या व्यक्तींना डायबिटीसची समस्या नव्हती. अशा लोकांनाही कोरोनाचं संक्रमण झाल्यानंतर डायबिटीसची समस्या निर्माण झाली. शरीरातील इंसुलिन तयार होण्याचे प्रमाण कमी झाले होते. मानवी शरीरातील जठराग्नीत इंसुलिन तयार करत असलेल्या पेशींवर कोरोनाच्या संक्रमणाचा प्रभाव पडतो. त्यामुळे साखरेची निश्चित राहत नाही.
परिणामी टाईप १ डायबिटीसच्या समस्येचा सामना करावा लागतो. या चारही युनिव्हर्सिटीतील संशोधक आता कोरोनातून बाहेर आलेल्या लोकांचे मुत्र, रक्त, आणि शरीरातील साखरेच्या पातळीत झालेल्या बदलांवर संशोधन करत आहेत. डायबिटीसचा सामना करत असलेल्या लोकांची रोगप्रतिकारकशक्ती कमजोर असल्यामुळे त्यांना संक्रमणाचा सामना करावा लागतो.
काही दिवसांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेकडून डायबिटिसच्या रुग्णांसाठी गाईडलाईन्स जारी करण्यात आली होती. डायबिटीसच्या रूग्णांनी कोरोना व्हायरसचं संक्रमण वाढत असताना सध्या काही दिवस लोकांना भेटणं टाळलं पाहिजे. मुळात डायबिटीसने पीडित रूग्णांना कोणत्याही प्रकारचं संक्रमण होण्याचा धोका अधिक असतो. अशात जर ते कोरोनाने पीडित व्यक्तीच्या संपर्कात आले तर त्यांनाही याची लागण होऊ शकते.
डायबिटीसच्या रूग्णांनी तसं तर नियमित त्यांची ब्लड शुगर चेक करायला पाहिजे. जेणेकरून काही समस्या होऊ नये. दरम्यान आता कोरोनाच्या वाढत्या प्रभावातही डॉक्टरांनी हा सल्ला दिला आहे की, डायबिटीसच्या रूग्णांनी वेळोवेळी त्यांची ब्लड शुगर लेव्हल चेक केली पाहिजे. हाय ब्लड शुगर लेव्हलमुळे इम्यून सिस्टीम कमजोर होऊ शकते. इम्यून सिस्टीम कमकुवत झाली तर त्यांना कोरोनाची लागण सहजपणे होऊ शकते. त्यामुळे ब्लड शुगर लेव्हल वेळोवेळी चेक करावी. हातांची स्वच्छता करावी, मास्कचा वापर करावा आणि प्रॉपर हायजीनची काळजी घ्यावी. असं करून डायबिटीसचे रूग्ण कोरोनापासून बचाव करू शकतील.
सोशल डिस्टेंसिंगबाबत WHO ने दिला मोलाचा सल्ला; 'असे' आहेत इतर देशांचे नियम
आजारांपासून चार हात लांब राहण्यासाठी 'या' भाज्याचे करा सेवन; वाचा आरोग्यवर्धक फायदे