शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
2
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
3
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
4
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
5
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
6
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
7
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
8
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
9
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
11
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
12
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
13
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
14
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
15
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
16
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
17
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
18
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
19
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

Coronavirus: समजून घ्या ‘कोरोना’! अनेक जण वापरणाऱ्या नेबुलायझरपासून सावधान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2020 11:15 PM

या निमित्ताने वैद्यकीय क्षेत्रातून साध्या सर्दी-खोकल्यासाठी नेबुलायझर ही परंपराच हद्दपार करावी.

डॉ. अमोल अन्नदातेआपल्याकडे वर्षानुवर्षे सर्दी- खोकल्यासाठी रुग्णालयात किंवा घरी नेबुलायझरने वाफ घेणे सुरू आहे. खरे तर दमा व अ‍ॅलर्जी सोडून इतर नियमित येणाºया ताप, सर्दी, खोकल्याला अशा नेबुलायझरमधून वाफ घेण्याची गरज नसते. यातून बाळाच्या पालकांना फक्त खोकल्यासाठी काही तरी करत असल्याचे मानसिक समाधान मिळत असते. आता तर दम्याच्या रुग्णांनाही फक्त इन्हेलर म्हणजे मीटर्ड डोस इन्हेलरचाच वापर करावा व त्यांच्यासाठी ही नेबुलायझरची गरज नाही, असे आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे सांगतात. सध्या ‘कोविड-१९’ साथीच्या काळात तर हॉस्पिटल- क्लिनिकच्या वेटिंग रूममध्ये कोपºयात असलेल्या एकाच नेबुलायझरमधून अनेक मुलांना नेबुलायझेशन देणे घातक ठरू शकते.

या निमित्ताने वैद्यकीय क्षेत्रातून साध्या सर्दी-खोकल्यासाठी नेबुलायझर ही परंपराच हद्दपार करावी. नेबुलायझर वापरण्याची वेळ येतच असेल, तर बाळासाठी नवा आणि वेगळा नेबुलायझर वापरावा. नेबुलायझरचा सर्वांत मोठा धोका म्हणजे बाधित रुग्ण इतरांसमोर, ते इतरांसमोर वापरत असल्यास यातून उडणारे श्वासाचे कण अधिक दूरवर उडून इतरांनाही संसर्ग करू शकतात. निदान झालेल्या रुग्णाला नेबुलायझरचा वापर करावा लागलाच, तर तो बंद खोलीमध्येच करावा. नंतर ही जागा सोडियम हायपोक्लोराईट ने निर्जंतुक करावी. घरात दोन मुले असतील, तर त्यांचेही नेबुलायझर एकमेकांना वापरू नये. एकाच घरात दम्याचे रुग्ण असतील तर सर्वांनी वेगवेगळे इन्हेलर वापरावे. नेबुलायझरप्रमाणे इन्हेलरमधून श्वासाचे कण बाहेर उडत नाहीत. उपयोगी असलेल्या इन्हेलरची सवय लागेल का, अशी शंका पालकांना असते; पण फारसे उपयोगाचे नसलेले नेबुलायझर मात्र त्यांना हवेहवेसे असते. कोरोनाच्या निमित्ताने हे सर्व गैरसमज दूर झाले पाहिजे.

(लेखक बालरोगतज्ज्ञ असून वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या