शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत? 'हे' यावेत किंवा 'ते' यावेत; पण...
2
केवायसी नाही म्हणून खाते फ्रीझ करू नका! आरबीआयने सर्व बँकांना खडसावले
3
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
4
गौतम अदानींना अमेरिकेत अटक होऊ शकते? जाणून घ्या दोषी आढळल्यास काय शिक्षा होईल
5
Employment: देशात १९ लाख तरुणांना महिनाभरात मिळाले जॉब; ९.३३ टक्के अधिक संधी
6
सांगोल्यात उच्चांकी मतदानामुळे निकालाची उत्कंठा वाढली; महिलांच्या मतदानाचा फायदा कोणाला?
7
दगाफटका टाळण्यासाठी काँग्रेसकडून खबरदारी, विदर्भातील आमदारांना विशेष विमानाने सुरक्षित ठिकाणी हलवणार
8
माढ्याचा मतदानाचा वाढलेला टक्का कोणाकडे?; गावागावांतील नेतेमंडळी गुंतले आकडेमोडीमध्ये!
9
निवडणुकीत डिपॉझिट वाचवण्यासाठी उमेदवारांना किती मतांची गरज असते?; जाणून घ्या सविस्तर
10
मणिपुरात आमदाराच्या घरातून दीड कोटीचे दागिने लुटून नेले; जमावाने केली नासधूस
11
यशस्वीचा ऑस्ट्रेलियातील पहिला डाव अयशस्वी! टीम इंडियाचा युवा हिरो स्टार्कसमोर ठरला झिरो (VIDEO)
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कामात यशस्वी व्हाल, आर्थिक लाभ होण्याची शक्यता!
13
Zomato च्या झीरो सॅलरी ऑफरमध्ये नवा टर्न; बॅकफायरनंतर दीपिंदर गोयल यांनी आता काय केल?
14
जगभर : सौदी अरेबियाने १०१ परदेशी नागरिकांना लटकवलं फासावर!
15
याला म्हणतात संस्कार! कैलाश खेर समोर येताच गौरव मोरे पडला पाया, अभिनेत्यावर होतोय कौतुकाचा वर्षाव
16
IND vs AUS : बुमराहच्या नेतृत्वाखाली या दोन नव्या चेहऱ्यांना मिळाली पदार्पणाची संधी
17
‘ती’ वादग्रस्त विधाने आयोगाच्या रडारवर; केंद्रीय मुख्य आयुक्तांनी मागवले अहवाल
18
करवीर ते कुलाबा 40 टक्के मतांचे अंतर; असे का ते समजून घ्या!
19
बीड जिल्ह्यात मतदान केंद्र फोडले; ४० जणांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल
20
दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानमध्ये ५० ठार; मृतांमध्ये आठ महिला, पाच लहान मुलांचा समावेश

Coronavirus: समजून घ्या ‘कोरोना’! एन-९५ मास्क निर्जंतुक करून परत कसे वापरणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2020 1:31 AM

निर्जंतुकीकरणाच्या या दोन्ही पद्धती फक्त एन-९५ मास्क साठीच आहेत व कापडी, सर्जिकल व इतर मास्कसाठी नाहीत, याची नोंद घ्यावी

डॉ. अमोल अन्नदाते

सध्या रुग्णालयांसह सगळी कडे एन ९५ मास्कचा तुटवडा आहे. पण जर तुमच्याकडे ५ एन ९५ मास्क असतील तर तुम्ही घरच्या घरी निजंर्तुकीकरण करून एका व्यक्ती साठी वारंवार वापरू शकता. अनेक डॉक्टर ही अशा प्रकारे मास्क वापरत आहेत. हे पुढील प्रमाणे करता येईल...अ. ५ मास्कला १ ते ५ असे नंबर द्यावे.ब. गॅलरीमध्ये/मोकळ्या हवेत ४ कागदी पिशव्या दोरीला लटकवून ठेवा व त्यांना १ ते ४ नंबर द्या.क. शक्यतो जिथे या पिशव्या लटकवलेल्या असतील तिथे फार धूळ नसेल असे बघा.ड. पहिल्या दिवशी मास्क वापरून झाल्यावर तो १ नंबरच्या पिशवीत टाका. दुसऱ्या दिवशी नवीन मास्क वापरा. वापरून झाल्यावर २ नंबरच्या पिशवीत टाका. अशा प्रकारे चौथा दिवस येईल तेव्हा पाचवा मास्क वापरा व तो वापरून झाल्यावर १ नंबरच्या पिशवीत टाका व १ नंबरच्या पिशवीतील मास्क वापरा.इ. याचा अर्थ एक मास्क घातलेला असेल व चार सदैव पिशवीत असतील.फ. मोकळ्या वाºयात मास्क ७२ तासात निर्जंतुक होतो. यासाठी त्याला दिवस (एक दिवस अधिक) वापरण्या आधी मिळतो आहे.ग. या मास्कचा सूर्य प्रकाशाशी संबंध येऊ देऊ नका. कारण सूर्य प्रकाशात एन-९५ मास्कची उपयुक्तता नष्ट होते.जर मास्क एकच असेल तरी तो घरी निजंर्तुक करता येतो पण याची प्रक्रिया जरा किचकट व करायला अवघड आहे. यासाठी स्वयंपाक घरातील ओव्हनचा वापर केला जाऊ शकतो. ओव्हनमध्ये इतर कुठे ही मेटलशी मास्कचा संपर्क न येता, लाकडी क्लिपच्या सहाय्याने ती लटकवून ठेवावी. ओव्हन बंद करून ७० डीग्री तापमानावर ३० मिनिटे ओव्हन चालू ठेवावे. एवढा वेळ व तापमान एन-९५ मास्कला निर्जंतुक करण्यास पुरेसा आहे. यासाठी प्लास्टिकची क्लिप वापरू नये.

(निर्जंतुकीकरणाच्या या दोन्ही पद्धती फक्त एन-९५ मास्क साठीच आहेत व कापडी, सर्जिकल व इतर मास्कसाठी नाहीत, याची नोंद घ्यावी)(लेखक बालरोगतज्ज्ञ असून वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या