(Image Credit-Pixabay)
सध्याच्या घडीला इतिहासातील सगळ्यातील मोठी लसीकरण मोहिम सुरू झाली आहे. ब्लूमबर्गद्वारे समोर आलेल्या आकडेवारीनुसार या अभियानाअंतर्गत एकूण १०८ देशात लोकांना २७१ मिलियन म्हणजेच २७.१ कोटी कोरोनाच्या लसी देण्यात येणार आहे. म्हणजेच प्रत्येक दिवशी लाखो लोाकांचे लसीकरण केलं जाणार आहे. ज्यात आरोग्य कर्मचारी, वयस्कर लोक आणि महिलांचाही समावेश असणार आहे.
यादरम्यान डॉक्टरांनी एक हैराण करणारा खुलासा केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाची लस घेतल्यानंतर काही महिन्यांनी महिलांना स्तनांमध्ये सुजेच्या गाठी विकसित होण्याचे प्रकार समोर आले आहेत. ही घाबरण्यासारखी गोष्ट असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.
अमेरिकेतील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार या गाठी शरीरातील लिम्फ नोड्समध्ये तयार होत आहे. लिम्फ नोड एक वाहिन्यांचे एक नेटवर्क आहे. त्यामळे किटाणूंची छाननी केली जाते. गाठ छातीच्या अशा भागात तयार होत आहे. ज्या बाजूच्या हातावर महिलांनी लस घेतली आहे. मॅमोग्राममध्ये अनेक महिलांमध्ये लसीकरणानंतर या गाठीचा त्रास असल्याचा खुलासा झाला आहे. यामुळे ब्रेस्ट कॅन्सरची अनावश्यक भिती वाढत आहे. मेमोग्राम एक छातीच्या एक्स-रे चं परिक्षण आहे. डॉक्टर ब्रेस्ट कॅन्सरची चाचणी करण्यासाठी मेमोग्रामचा वापर करतात. म्हणून याला मेमोग्राफी असंही म्हणतात.
या परिणामांच्या आधारे अमेरिकेतील डॉक्टरांनी महिलांना आवाहन केलं आहे की, कोरोनाची लस घेतल्यानंतर चार आठवड्यांपर्यंत मॅमोग्रामसाठी जाऊ नका. डेली मेलच्या एका रिपोर्टनुसार तज्ज्ञ म्हणतात की, लिम्फ नोड्समध्ये सुज येणं हे अन्य लसी घेतल्यानंतरही (टीबीसाठी बीसीजीची लस, फ्लूची लस) दिसून येऊ शकतं.सावधान! कोरोना संक्रमित लोकांनी चुकूनही करू नये या औषधाचं सेवन; WHO चा इशारा
तज्ज्ञांनी डॉक्टरांना आवाहन केलं आहे की, रुग्णांची त्वरित बायोप्सी करू नये. याऐवजी कोरोना लसीबाबत अधिक माहिती मिळवायला हवी. ही लस कधी घ्यायची आणि कोणत्या हातात घ्यायला हवी याची माहिती डॉक्टरांकडून घेतल्यास फायद्याचं ठरेल. काळजी वाढली! महाराष्ट्रात वाढतोय कोरोनाचा धोका; मागच्या २४ तासात समोर आली हादरवणारी आकडेवारी