कोरोना व्हायरसशी लस तयार होईपर्यंत या माहामारीपासून बचावासाठी संपूर्ण जगभरात खबरदारीचे उपाय घेतले जात आहे. मास्कचा वापर, सोशल डिस्टेंसिंग आणि स्वच्छतेचं पालन करताना लोक दिसून येत आहेत. लस येण्यासाठी बराचवेळ लागण्याची शक्यता आहे. दरम्यान शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना काळात मास्कचा वापर करून रोगप्रतिकारकशक्ती वाढवता येऊ शकते. त्यामुळे कोरोना संक्रमणाचा वेग कमी होऊ शकतो. मास्क व्हायरसच्या संक्रमण पसरवत असलेल्या कणांना फिल्टर करू शकतो. पण पूर्णपणे रोखू शकत नाही. अशा स्थितीत कोरोना संक्रमण झाल्यास जास्त घातक ठरणार नाही. तीव्र ताप येण्यापेक्षा सौम्य तापची लक्षणं दिसण्याप्रमाणे आहे.
न्यू इंग्लँड जर्नल ऑफ मेडिसिन कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीमध्ये मोनिका गांधी आणि जॉर्ज रदरफोर्ड यांनी हा विचार समोर ठेवला आहे. कांजिण्या या आजारात लोक आधीपासूनच लसीकरण करायचे. त्यामुळे रुग्णाच्या संपर्कात आल्यानंतर सौम्य स्वरुपाचे इन्फेक्शन होत असे. पण गंभीर आजारी पडण्यापासून वाचवता येत होतं. तज्ज्ञांनी कोविडच्या बाबतीतही अशी शक्यता वर्तवली आहे. यामागे वायरल पॅथोजेनेसिसची जूनी थिअरी आहे. यात असं सांगण्यात आलं होतं की आजाराची गंभीरता व्हायरसं संक्रमण शरीरात किती प्रमाणात पसरतं यावर अवलंबून असते.
फेसमास्क वापरून संक्रमणापासून बचाव केला जाऊ शकतो. यामुळे व्हायरसचा प्रभावी कमी होतो. या अभ्यास सांगण्यात आले की, मास्क व्हायरसच्या कणांना फिल्टर करतो. उंदरांवर करण्यात आलेल्या चाचणीत या प्रयोगाचे समाधानकारक परिणाम दिसून आले आहेत. ज्या उंदरांना मास्क लावण्यात आलेला त्या उंदरांमध्ये संक्रमणाची तीव्रता कमी दिसून आली.
इंस्टिट्यूट ऑफ लिवर एंड बायलरी साइंसेजचे डॉ एसके सरीज यांनी सांगितले की, दिल्लीतील २९ टक्के लोकसंख्येत एंटीबॉडी पॉझिटिव्ह असूनही इन्फेक्शन झालं नव्हतं. त्यांनी सांगितले की, मास्कचा वापर केल्यानं शरीरात इन्फेक्शन झाल्यास त्याची तीव्रता कमी असते. रुग्णांची गंभीर स्थिती होण्यापासून रोखता येऊ शकतं.
२०२०-२१ मध्ये १०० कोटी लोकांपर्यंत कोरोना लस पोहोचणार; रशियाचा दावा
संपूर्ण जगभरातील लोक कोरोना लसीच्या प्रतिक्षेत आहेत. कोरोना रुग्णांची संख्या २ कोटी ७० लाखांपेक्षा जास्त आहे. रशियाात कोरोना लसीचे डोज नागरिकांना देण्यास सुरूवात झाली आहे. जगातली पहिली वॅक्सिन स्पुतनिक व्ही लस पहिली टप्प्यातील लसीकरणात नागरिकांना लस दिली जाणार आहे. एका रिपोर्टनुसार रशियानं घोषणा केली आहे की २०२०-२१ मध्ये एक बिलियन म्हणजेच १०० कोटींपेक्षा जास्त लोकांचे लसीकरण केले जाणार आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सनं इंटरफॅक्सवृत्त संस्थेच्या हवाल्यानं ही माहिती दिली आहे. या लसीबाबत अधिक माहिती तुम्हाला सांगणार आहोत.
रशियातील आरडीआयएफनं ब्राजीलसह इतर देशांमध्ये लसीच्या निर्यात करण्याच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या व्यतिरिक्त कजाकिस्तानसोबतही करार करण्यात आला आहे. सुरुवातीला २० लाखपेक्षा अधिक लसीचे खुराक खरेदी करण्यासाठी तयार असून नंतर ५० लाख डोज मागवण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्सनुसार भारतात रशियन लसीचे ३० कोटी डोज उत्पादित केले जाणार आहेत. या लसीचे तिसऱ्या टप्प्यातील चाचणी अजूनही पूर्ण झालेली नाही. या महिन्यात या लसीची चाचणी भारतात होणार आहे. रशियनन डायरेक्टर इनवेस्टमेंट फंडाचे सीईओ किरिल दिमित्रिव यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतासह संयुक्त अरब, सौदी अरब, फिलीपींस आणि ब्राजिलमध्ये या महिन्यापासून चाचणीला सुरूवात होणार आहे.
ब्लादिमीर पुतिन यांनी ११ ऑगस्टला स्पुतनिक व्ही ही लस लॉन्च केली होती. याशिवाय या लसीच्या परिणामकारकतेबाबतही सांगण्यात आले होते. ही लस पूर्णपणे सुरक्षित आणि प्रभावी असून त्यांनी आपल्या मुलीलाही ही लस दिल्याचा दावा केला होता. ही लस मॉस्कोतील गमलेया रिसर्च इंन्स्टिट्यूटनं विकसित केली आहे. वैद्यकिय नियतकालिक लेसेंटमध्ये छापण्यात आलेल्या माहितीनुसार सुरूवातीच्या ट्रायल दरम्यान ही लस सुरक्षित असल्याचे दिसून आले आहे. याशिवाय लसीचे कोणतेही साईड इफेक्ट्स दिसून आलेले नाहीत. ही लस घेतल्यानंतर स्वयंसेवकांच्या शरीरात एंटीबॉडीज तयार झाल्या आल्या.
हे पण वाचा-
खुशखबर! २०२०-२१ मध्ये १०० कोटी लोकांपर्यंत कोरोना लस पोहोचणार; रशियाचा दावा
CoronaVirus News : लढ्याला यश! स्वदेशी लसीची प्राण्यांवर यशस्वी चाचणी, भारत बायोटेकची घोषणा