कोरोनाच्या जीवघेण्या माहामारीपासून बचावासाठी लस कधी येणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. आता कोरोनाच्या लसीबाबत एक चिंताजनक बाब समोर येत आहे. कोरोनाची बनावट लस बाजारात येऊ शकते. अशा धोक्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. जर कोणत्याही कोरोना लसीच्या विक्रीची घोषण करण्यात आली. तर ती बनावट लस सुद्धा असू शकते. ब्रिटनच्या नॅशनल क्राईम एजेंसीनं याबाबत अधिक माहिती दिली आहे. independent.co.uk च्या रिपोर्टनुसार ब्रिटनच्या अधिकाऱ्यांनी कोरोनाच्या बनावट लसीची विक्री रोखण्यासाठी कारवाईसुद्धा सुरू केली आहे.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या माहाामारीच्या सुरूवातीच्या काळात बनावट पीपीई किट विकण्याचा प्रयत्न सुद्धा अनेक गुन्हेगारांकडून करण्यात आला होता. ब्रिटनच्या नॅशनल क्राईम एजेंसीच्या इकोनॉमिक क्राईम सेंटरचे डायरेक्टर जनरल ग्रेएम बिगर यांनी सांगितले की, ''बनावट लसींची विक्री झाल्यास मोठा धोका निर्माण होऊ शकते. लस तयार झाल्यानंतर लोकांना बनावट लस देणारी गँग सक्रिय होऊ शकते. अशी वेळ येण्यापासून रोखण्यासाठी सगळ्यात आधी तयारी करायला हवी. ''
प्रमुख ब्रिटिश अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसबाबत अनेक गुन्हेगारी घटना घडत आहेत. मधल्या काळात कोरोनाची बनावट चाचणी, तसंच बनावट टेस्टिंग किट विक्रीचा प्रयत्न करण्यात आला होता. आधी अमेरिका, ब्रिटनमधील अधिकाऱ्यांनी सांगितले होते. की, लसीबाबत अनेक संस्थांवर हॅकर्सनी सायबर हल्ला केला आहे. लसीशी निगडीत माहिती चोरी करण्याच्या उद्देशाने हा हल्ला करण्यात आला होता.
मोठा दिलासा! भारतातील बहुतेक लोकांना कोरोना लसीची गरज भासणार नाही?; एम्सच्या डॉक्टरांचा दावा
फायजर, ऑक्सफोर्ड तसंच नोवावॅक्ससह अनेक कंपन्या लसीचे शेवटच्या टप्प्यातील चाचणी करत आहेत. पुढच्या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत लस उपलब्ध होईल अशी आशा अनेक तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. फायझरने केलेल्या दाव्यानसार ९० टक्के लोकांमध्ये ही लस प्रभावी असल्याचे दिसून आले असल्याचा दावा करण्यात आला होता. फायझरच्या या लसीची चाचणी ६ देशांतील ४३५०० जणांपेक्षा अधिक स्वयंसेवकांवर घेण्यात आली आहे. तिसऱ्या टप्यातील ही आकडेवारी आहे.
मास्क धुवून उन्हात सुकवल्याने ९९.९९ % व्हायरस नष्ट होतो? जाणून घ्या दाव्यामागचं सत्य
फायझरची ही लस ९० टक्के परिणामकारक असली तरीही मोठे आव्हान म्हणजे ही लस लोकांपर्यंत पोहोचविणे आहे. कारण ही लस उणे ७० डिग्री सेल्सिअल तापमानात ठेवावी लागते. सध्या फ्रिजमध्ये ही लस २४ तासही टिकत नाही.ट्रायलमध्ये कोरोना लसीने त्रास दिला असला तरीही शेवटी निकाल चांगले आले आहेत. यामुळे कोरोना जगातून घालविण्यासाठी आशेचा किरण दिसू लागला आहे.