कोरोना विषाणूनं संपूर्ण जगभरात गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून कहर केला आहे. कोरोना रुग्णांचे उपचार करण्यासाठी गंभीर आजारांसाठी वापरात असलेल्या औषधांचा वापर केला जात आहे. कोरोनाची लस कधी उपलब्ध होणार याकडे सगळ्यांचेच लक्ष आहे. दरम्यान कोरोना विषाणूंशी लढण्याासाठी संपूर्ण जगभरातील देश लस तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत. नीति आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतात विकसित केल्या जात असलेल्या लसींमध्ये तीन लसींच्या चाचण्या वेगवेगळ्या टप्प्यात आहेत.
डॉ. व्हीके पॉल कोव्हिड-19 लशीच्या राष्ट्रीय तज्ज्ञ गटाचे प्रमुख देखील आहेत. पॉल यांनी सांगितले की, कोरोना लसीच्या मानवी चाचणीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे आणि चाचणीच्या दुसर्या टप्प्यात प्रवेश केला आहे. तर, दुसर्या लशीच्या दुसर्या व तिसर्या टप्प्यातील मानवी चाचण्यांची प्रक्रियाही सुरू झाली आहे. या सकारात्मक माहितीमुळे तज्ज्ञांमध्येही उत्साहाचं वातावरण आहे.
भारतीय लसीच्या चाचण्या कुठपर्यंत?
झायडस कॅडिला लसीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून अजून एक टप्पा सुरू आहे. ही भारतीय बनावटीची लस आहे. आयसीएमआर आणि भारत बायोटेकने तयार केलेल्या लसीने पहिला टप्पा पूर्ण केला आणि फेज 2 साठी लोकांचे रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे. हीदेखील भारतीय लस आहे. आणखी एका लसीचे ट्रायल सीरम इंस्टिट्युटही करीत आहे. सीरम ऑक्सफोर्ड लसीवर काम करत आहे. अॅस्ट्रॅजेनेका ही याची बेस कंपनी आहे. सध्या या लसीचे ट्रायल थांबवण्यात आले आहे. दुसरीकडे रशियाच्या Sputnik V लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी भारतात होणार आहे. रशियाच्या विनंतीनुसार भारत या लशीवर चर्चा करत आहे.
भारतात रशियन लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी होणार
रशियाच्या कोरोना लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी भारतात सुरू होणार आहे. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेदरम्यान देण्यात आली. नीती आरोग्याचे सदस्य डॉ. वीके पॉल यांनी दिली. त्यांनी सांगितले की, ''रशियाच्या सरकारनं भारत सरकारशी संपर्क केला असून लस तयार करण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केलं आहे. रशियानं दिलेल्या माहितीनुसार लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी भारतात होणार आहे. रशियाशी भारताचे नेहमी मित्रत्वाचे नाते राहिले आहे. या लसीची चाचणी यशस्वी झाल्यास भारतासह रशियासाठीही मोठा विजय असेल. भारत सरकारनं रशियाच्या या प्रस्तवाला मान्यता दिली आहे. रशियाच्या कोरोना लसीची चाचणी भारतीय स्वयंसेवकांवर होणार आहे. ''
ऑक्सफोर्डनं कोरोनावरच्या लसीची चाचणी थांबवली
कोरोनाच्या विरोधातल्या लढाईत मोठं अपयश आलं असून, लढ्याला मोठा धक्का बसला आहे. अॅस्ट्रॅजेनेका(AstraZeneca) आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी लस(Oxford covid-19 Vaccine)च्या मानवी चाचणीत सामील असलेली व्यक्ती आजारी पडल्यानंतर त्याचा प्रयोग थांबवण्यात आला आहे. अॅस्ट्रॅजेनेका यांनी एक निवेदन जारी केले आहे की, चाचणीत एक नियमित व्यत्यय आलं आहे, कारण चाचणीत सामील झालेल्या व्यक्तीच्या आजाराबद्दल अद्याप काहीही समजू शकलेले नाही.
या लसीला AZD 1222 असे नाव देण्यात आले. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन(WHO)च्या मते, जगातील इतर लसींच्या चाचण्यांच्या तुलनेत हे आघाडीवर होते. ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या लसीकडे भारतासह अनेक देशांचे लक्ष लागून आहे. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी मार्केटमध्ये पहिले स्थान मिळवेल, अशी आशा आहे. तसेच तज्ज्ञांचेही मत आहे.
हे पण वाचा-
मोठा धक्का! एक व्यक्ती आजारी पडल्यानंतर ऑक्सफोर्डनं कोरोनावरच्या लसीची चाचणी थांबवली
खुशखबर! भारतीय महिला शास्त्रज्ञानं तयार केली कोरोनाची लस; लवकरच चाचण्यांना सुरूवात होणार