शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

कोरोनाच्या लढ्याला मोठं यश! यशस्वी चाचणीनंतर आता ३० हजार लोकांवर लसीचे परिक्षण होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 5:35 PM

CoronaVirus News & Latest Updates : नॅशनल इंस्टिट्यूट्स ऑफ हेल्थ आणि मॉर्डना इंकमधील डॉ. फाउची यांनी ही लस विकसित केली आहे. 

अमेरिकेतील कोरोनाच्या लसीने जगभराला आशेचा किरण दाखवला आहे.  तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार आता लसीची मोठ्या स्तरावर चाचणी केली जाणार आहे.  ही माहिती यूयॉर्क टाईम्सकडून प्रकाशित करण्यात आली आहे. या कंपनीच्या ट्रायलशी जोडलेल्या काही गोष्टी clinicaltrials.gov वर नमुद करण्यात आल्या आहेत. हे संशोधन २०२२ पर्यंत सुरू राहणार आहे. नॅशनल इंस्टिट्यूट्स ऑफ हेल्थ आणि मॉर्डना इंकमधील डॉ. फाउची यांनी ही लस विकसित केली आहे. 

२७ जुलैपासून या लसीची चाचणी सुरू होणार आहे. तीस हजार लोकांवर हे मानवी परिक्षण केले जाणार आहे. ही लस कोरोना व्हायरसच्या संक्रमणापासून माणसांना वाचवू शकते. मंगळवारी ४५ लोकांवर टेस्ट केल्यानंतर त्याचे रिपोर्ट तपासण्यात आले. त्यात असं दिसून आलं की स्वयंसेवकांच्या शरीरात एंटीबॉडीजची वाढ झाली होती. 

संशोधकांच्या टीमने दिलेल्या माहितीनुसार कोरोनाची लस घेतलेल्या रुग्णांमध्ये जितके एंटीबॉडी दिसून आले तितकेच एंटीबॉडी कोरोनाच्या संक्रमणातून बाहेर आलेल्या रुग्णांमध्ये दिसून आले होते. आतापर्यंत लस कधी अंतीम टप्प्यात पोहोचणार याबाबत काही कल्पना देण्यात आलेली नाही. यावर्षाच्या अखेरपर्यंत लसीचे मानवी परिक्षण पूर्ण होऊ शकते.  

चाचणीसाठी ही लस दोनदा दिली जाणार आहे. त्यामध्ये एका महिन्याचे अंतर असेल. या लसीचे कोणतेही साईच इफेक्ट्स नाहीत. लस घेतल्यानंतर फ्लू आणि ताप यांसारखी लक्षणं जाणवत आहेत. लस दिल्यानंतर अनेकांना थंडी वाजणे, ताप येणं, पोटदुखी अशा समस्यांचा सामना करावा लागला होता.

सुरूवातीच्या चाचणीत या लसीचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. अंतीम टप्प्यात ही लस किती परिणामकारक ठरते हे दिसून येईल. दरम्यान मॉर्डना इंक या कंपनीचे शेअर्स १५ टक्क्यांनी वाढले आहेत. यानंतरच्या मानवी परिक्षणात फक्त तरूणांनाच नाही तर वयस्कर लोकांनाही सामिल करून घेतलं जाणार आहे. 

३० हजार लोकांवर होत असलेले हे मानवी परिक्षण सगळ्यात मोठ्या स्तरावरील मानवी चाचण्यांपैकी असणार आहे. याशिवाय ऑक्सफोर्ड युनिव्हरर्सिटी, जॉनसन एंड जॉनसन आणि भारतातील भारत बायोटेक या कंपनीचे क्लिनिकल ट्रायलचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. तसंच फायजर कंपनीही कोरोनाची लस विकसित करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

त्वचेवरचे 'ते' डाग असू शकतात कोविड 19 चे लक्षणं; कोरोना संसर्ग झाल्यास जाणवतो असा त्रास

कोरोना विषाणूंचा रहस्यमय हल्ला; वेगवेगळं राहत असूनही ३५ दिवसात ५७ लोकांना कोरोनाची लागण

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य