जगभरासह देशभरात कोरोना विषाणूंची लागण होण्याचं प्रमाण झपाट्याने वाढत आहे. भारत ,अमेरिका, ब्राझिल आणि रशिया या देशांत सगळ्यात जास्त लोकसंख्या कोरोनाबाधित आहे. भारतात कोरोना विषाणूंच्या दोन लसींवर संशोधन सुरू आहे. कोरोनाच्या लसीचे माकडांवरचे आणि सश्यांवरची चाचणी यशस्वी झाल्यानंतर आता माणसांवरही परिक्षण सुरू केले जाणार आहे. चाचणीचे सगळे टप्पे यशस्वी झाल्यास या वर्षांच्या शेवटापर्यंत किंवा २०२१ च्या सुरूवातीला लस येऊ शकते. याआधी कोरोनाची लस तयार करण्यासाठी दोन कंपन्या सगळ्यात पुढे आहेत.
ब्रिटेनच्या ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटीचे पहिले मानवी परिक्षण यशस्वी झाले आहे. ब्राझिलमध्ये करण्यात आलेल्या ह्यूमन ट्रायलचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. या चाचणीत समावेश असलेल्या स्वसंसेवकांमध्ये व्हायरसच्या विरोधात लढण्याची क्षमता विकसित झाली आहे. ऑक्सफोर्ड युनिव्हरर्सिटीतील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबर २०२० मध्येच कोरोनाची लस तयार होऊ शकते. या लसीचे उत्पादन AstraZeneca करणार आहे.
भारतीय कंपनी सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडीयाचा (SII) सुद्धा यात सहभाग आहे. कोरोनाच्या माहामारीला रोखण्याासाठी जगभरातील १०० पेक्षा जास्त कंपन्या लसीचे परिक्षण करत आहेत. त्यापैकी फक्त दोन लसी या अंतीम टप्प्यात पोहोचल्या आहेत. सेचेनोव विद्यापीठाचे प्रमुख एलेना स्मोलिआर्चुक यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्य स्वरूपात लोकांच्या सुरक्षेचा विचार करून चाचणी केली जात आहे.
कोरोना व्हायरसपासून लोकांचा बचाव करण्यासाठी भारत बायोटेक कंपनी (Vaccine maker Bharat Biotech) नाकाद्वारे घेतली जाणारी लस विकसित करत आहेत. यूनिवर्सिटी ऑफ विस्कांसिन मेडीसन (University of Wisconsin Madison) आणि वॅक्सीन निर्माता कंपनी फ्लूजेन (FluGen) वायरोलॉजिस्टनी भारत बायोटेकसोबत मिळून कोविड 19ची लस विकसित करत आहे.
नाकातून दिली जाणार कोरोनाची लस
काही तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी नाकातून लस दिली जाणार आहे. कोरोना विषाणू नाकाद्वारे म्यूकस मेंमरेनच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करतो. त्यामुळे तोंड, नाक आणि पचनक्रिया प्रभावित होते. कोरोनाच्या संक्रमणापासून बचावसाठी नाकातून लस दिल्यास कोरोना व्हायरसवर नष्ट झाल्याने फुफ्फुसांपर्यंत पोहोचण्यापासून रोखता येऊ शकते. तसंच धोका टळू शकतो.
त्वचेवरचे 'ते' डाग असू शकतात कोविड 19 चे लक्षणं; कोरोना संसर्ग झाल्यास जाणवतो असा त्रास
कोरोना विषाणूंचा रहस्यमय हल्ला; वेगवेगळं राहत असूनही ३५ दिवसात ५७ लोकांना कोरोनाची लागण