अमेरिकन कंपनी मॉर्डनाने अलिकडेच आपली लस ९५ टक्के प्रभावी ठरल्याचा दावा केला होता. आता चीनच्या कंपनीने कोरोना व्हायरसच्या लसीबाबत आनंदाची बातमी दिली आहे. चीनी कंपनीने केलेल्या दाव्यानुसार या लसीमुळे कोरोना व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी एभावी एंटीबॉडीज विकसित करण्यात झाल्या आहेत. यासंबंधित संशोधन लँसेंट इंफेक्शियस डिसीज या पत्रिकेत प्रकाशित करण्यात आले आहे. या अभ्यासात दिलेल्या माहितीनुसार लसीच्या पहिल्या लसीकरणानंतर २८ दिवसांच्या आत लोकांच्या शरीरात एंटीबॉडीज तयार झाल्या होत्या.
माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार या अभ्यासाचे लेखक फेंगकई झू यांनी सांगितले की, ''आमच्या रिसर्चमधून हे स्पष्ट झालं की, कोरोनावॅक लसीचे दोन डोज १४ दिवसांच्या अंतरावर दिल्यानंतर लसीकरणाच्या चार आढवड्यानंतर शरीरात जास्तीत जास्त एंटीबॉडीज तयार होतात. जेव्हा कोरोना व्हायरसचा धोका नष्ट होईल तेव्हा एका महिन्याच्या आत लसीचे दोन डोस देणं हे लोकांच्या शरीरात दीर्घकालीन सुरक्षा प्रधान करण्यासाठी फायदेशीर ठरेल. कोरोनावॅक लसीची आता तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे.''
साधारणपणे कोरोनावॅक ही लस चीनी बायो फार्मास्युटिकल कंपनी सिनोवॅकद्वारे विकसित करण्यात आली आहे. ब्राझिलमध्ये जवळपास १० हजार लोकांवर या लसीची चाचणी सुरू आहे. पण नुकत्याच करण्यात आलेल्या चाचणीदरम्यान एका व्यक्तीवर गंभीर परिणाम दिसून आल्याने चाचणी थांबवण्यात आली आहे. दरम्यान चीन सध्या चार लसींवर काम करत आहे. या लसींची शेवटच्या टप्प्यातील वैद्यकिय चाचणी सुरू आहे. यात सिनोवॅक बायोटेकचा समावेश आहे. याव्यतिरिक्त चीनच्या पीपल्स लिब्रेशन आर्मी मेडिकल रिसर्च युनिटने सुद्धा कंपनी कॅनसिनोसोबत मिळून एक करार केला आहे. या लसीचा वापर चीनच्या सामान्य जनतेसाठीही केला जात आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी भारत करणार लसीच्या तब्बल १५० कोटी डोसची खरेदी
दरम्यान देशात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ८३ लाखांपेक्षा अधिक असून, त्यांचे प्रमाण ९३.५३ टक्क्यांवर पोहोचले आहे. एकूण रुग्णसंख्या ८९ लाखांहून जास्त असून, मृत्यूदर अवघा १.४७ टक्के आहे. सलग आठव्या दिवशी सक्रिय रुग्णांची संख्या पाच लाखांपेक्षा कमी आहे.
दिलासादायक! 'या' देशात फायजरच्या कोरोना लसीचे वितरण होणार; ४ राज्यात सुरूवात
कोरोना रुग्णांची संख्या ८९,१२,९०७ असून, बरे झालेल्यांचा आकडा ८३,३५,१०९ आहे. बुधवारी आणखी ३८,६१७ रुग्ण आढळले, तर ४७४ जण कोरोनामुळे मरण पावले. बळींची एकूण संख्या १,३०,९९३ झाली आहे. देशात सध्या ४,४६,८०५ सक्रिय रुग्ण आहेत. जगभरात ५ कोटी ५९ लाख रुग्ण असून, त्यातील ३ कोटी ८९ लाख रुग्ण बरे झाले, तर १३ लाख ४३ हजार लोकांचा मृत्यू झाला.