कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी संपूर्ण जगभरात लस तयार करण्याचे काम शास्त्रज्ञांकडून केले जात आहे. पण सर्वसामान्यपर्यंत लस कधी पोहोचेल याबाबत कोणालाही कल्पना नाही. या वर्षाच्या शेवटापर्यंत किंवा पुढच्या वर्षांच्या सुरूवातील कोरोनाची लस मिळेल असा दावा अनेक कंपन्यांनी केला आहे. या लसीची किंमत काय असेल याबाबत कोणतीही कल्पना देण्यात आलेली नाही. सध्या अमेरिकेनं कोरोनाच्या लसीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. एका रिपोर्टनुसार ट्रम्प सरकारनं बुधवारी अमेरिकेतील संसदेत सांगितले की, कोरोनाची लस मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे.
माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रम्प सरकारकडून बुधवारी कोरोना लसीबाबत एक रिपोर्ट देण्यात आला. त्यानुसार लसीसाठी सामान्य नागरिकांना पैसे मोजावे लागणार नाहीत. सरकारनं दिलेल्या माहितीनुसार सगळ्या राज्यात याबाबत पत्रिका देण्यात येणार आहेत. यात प्रकाशित करण्यात आलेल्या माहितीनुसार कोरोनाची लस देण्यासाठी अमेरिकेत अभियान सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी संरक्षण संस्था आणि आरोग्यव्यवस्थेकडून तयारी सुरू आहे. हे अभियान पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात सुरू केलं जाऊ शकतं. रिपोर्ट्सनुसार लसीच्या वितरणाचे काम अमेरिकेच्या सुरक्षा विभागाच्या मुख्यालयाकडून केलं जाणार आहे. तर लसीकरणाचे काम आरोग्य कर्मचारी करतील.
लस कधी उपलब्ध होणार
एका रिपोर्टनुसार अमेरिकन फार्मा कंपनी फायजरची लस ऑक्टोबरच्या शेवटापर्यंत उपलब्ध होऊ शकते. बायोएनटेक कंपनीचे सीईओ आणि सहसंस्थापक उगुर साहिन यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना याबाबत माहिती दिली होती. ही लस फायजर आणि बायोएनटेक या कंपन्यांनी मिळून तयार केली आहे.
भारतात लस कधी येणार
नुकतंच आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी सोशल मीडियावरून संडे संवादादरम्यान सांगितले की, अंदाजे कोरोनाची लस २०२१ च्या पहिल्या तीन महिन्यात उपलब्ध होऊ शकते. ज्या लोकांना गरज आहे अशांना सगळ्यात आधी लस पुरवली जाणार आहे. यात वयस्कर लोक, गंभीर आजारांनी पिडीत असलेले लोक, आरोग्यसेवेतील कर्मचारी, रोगप्रतिकारकशक्ती कमी असलेल्यांचा समावेश असेल. भारतात लस मोफत उपलब्ध होण्याबात अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.
अजून २ वर्ष कोरोनाच्या माहामारीपासून सुटका नाही; WHO च्या तज्ज्ञांचा दावा
कोरोना व्हायरसची प्रभावी लस मिळण्यासाठी संपूर्ण जग प्रयत्न करत आहे. कारण दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेनतील शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी केलेल्या विधानामुळे संपूर्ण जगभराच्या चिंतेत भर पडली आहे. मंगळवारी सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले की, सर्वसामान्य जीवन जगण्यासाठी अजून २ वर्ष वाट पाहावी लागणार आहे. कारण २०२२ च्या आधी कोरोनाची लस मिळणं कठीण आहे.
स्वामीनाथन यांनी पुढे सांगितले की, ''जागतिक आरोग्य संघटनेच्या कोवॅक्स या उपक्रमाअंतर्गत वेगवेगळ्या देशात लस पुरवण्याचं काम केलं जाणार आहे. त्यासाठी पुढच्या वर्षांच्या मध्यापर्यंत करोडो डोज तयार करावे लागतील. म्हणजेच या उपक्रमाशी जोडलेल्या १७० देशांच्या अर्थव्यवस्थांना या उपक्रमातून नक्की काहीतरी मिळवता येईल. जोपर्यंत लसीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत नाही तोपर्यंत मास्क आणि सोशल डिस्टेंसिंगच्या गरजा बदलण्यासाठी कमीत संख्येत डोस उपलब्ध असतील. २०२१ च्या शेवटापर्यंत जवळपास दोन कोटी डोज तयार करण्याचं उद्दीष्ट ठेवलं जाणार आहे.''
''पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात लस येईल आणि माणसं आधीसारखं जीवन जगायला सुरूवात करतील असं अनेकांना वाटत आहे. पण प्रत्यक्षात असं नसून पुढच्या वर्षांच्या मध्यापर्यंत लसीचं उत्पादन करून मुल्यांकन केलं जाईल. २०२१ च्या सुरूवातीला लसीचे परिणाम दिसायला सुरूवात होईल. जगभरातील सुरू असलेल्या लसीच्या चाचण्या पूर्ण होण्यासाठी जवळपास १२ महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्यावेळी लसीच्या साईड इफेक्ट्सं प्रमाण कमी झालेलं असेल. कोरोनाच्या लसीबाबत सगळ्यात आधी सुरक्षिततेचा विचार करणं गरजेचं आहे. अमेरिकेतील FDA (फूड एंड ड्रग एडमिनिस्ट्रेशन) कडून लवकरच लसीच्या आपातकालिन स्थितीतील वापराबाबत गाईडलाईन्स जारी करण्यात येणार आहेत. '' असंही त्या यावेळी म्हणाल्या.
हे पण वाचा-
आरोग्यदायी दुधीच्या सालीचे 'हे' फायदे वाचाल; तर फेकून देताना १० वेळा विचार कराल
काळजी वाढली! अजून २ वर्ष कोरोनाच्या माहामारीपासून सुटका नाही; WHO च्या तज्ज्ञांचा दावा
मोठा दिलासा! कोरोनाच्या लढाईत शास्त्रज्ञांना यश; बनवलं कोरोनावर मात करणारं Ab8 औषध
अरे व्वा! कोरोनाशी लढण्यासाठी 'या' २ गोष्टी ठरतील रामबाण उपाय; अमेरिकन तज्ज्ञांचा दावा
'कोरोना तर काहीच नाही; अजून २ मोठी संकटं येणार'; प्रसिद्ध अमेरिकन तज्ज्ञांचा दावा