कोविड-१९ च्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेत प्लाज्माची (Plasma Therapy) डिमांड फार वाढली. सोशल मीडियावरूनही बरेच लोक कोरोनातून बरे झालेल्या लोकांना प्लाज्मा डोनेट करण्याचं आवाहन करत होते. कारण कोविड-१९ च्या उपचाराबाबत इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चची गाइडलाईन हे सांगते की, लक्षण दिसल्यावर ७ दिवसांच्या आत प्लाज्मा थेरपीचा ऑफ लेबल वापर केला जाऊ शकतो. पण या थेरपीने काही फरक पडतो याचे पुरावे मिळाले नाहीत. ज्यानंतर आता असा निर्णय घेण्यात आला की ट्रीटमेंट प्रोटोकॉलमधून प्लाज्मा थेरपीला काढण्यात आलं आहे.
गेल्या आठवड्यात ICMR आणि कोविड-१९ च्या नॅशनल टास्क फोर्सची एक मीटिंग झाली. यात सर्वच सदस्यांनी प्लाज्मा थेरपीला अप्रभावी असल्याचं सांगितलं. तसेच या उपचाराला गाइडलाईन्समधून काढण्यास सांगितलं. काही वैज्ञानिक आणि डॉक्टर्सनी प्रिन्सिपल सायंटिफिक अॅडवायजर के. विजयराघवन यांना पत्र लिहिलं होतं. त्यातही प्लाज्मा थेरपीच्या तर्कहीन आणि अवैज्ञानिक वापराला बंद करण्याची मागणी केली होती. हे पत्र ICMR प्रमुख बलराम भार्गव आणि एम्सचे निर्देशक रणदीप गुलेरिया यांनी पाठवली होती. (हे पण वाचा : कोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन)
काय होती भीती?
हेल्थ एक्सपर्ट्सनी आपल्या पत्रात लिहिले होते की, प्लाज्मा थेरपीशी संबंधित गाइडलाईन्स उपलब्ध पुराव्यांवर आधारित नाही. काही सुरूवातीचे पुरावेही समोर ठेवले होते. ज्यांनुसार, फार कमी इम्युनिटी असलेल्या लोकांना प्लाज्मा थेरपी दिल्यावर न्यूट्रलायजिंग अॅंटीबॉडी कमी तयार होतात आणि कोरोनाचं नवं व्हेरिएंट समोर येऊ शकतं. हे पत्र पाठवणाऱ्यांमध्ये प्रसिद्ध वायरलॉजिस्ट गगनदीप कांग, सर्जन प्रमेश सीएस आणि इतरही तज्ज्ञ आहेत. या पत्रानुसार, प्लाज्मा थेरपीच्या तर्कहीन वापराने आणखी संक्रामक स्ट्रेन्स डेव्हलप होण्याची शक्यता वाढते.
इतर देशातील रिसर्च काय सांगतात?
ब्रिटनमध्ये ११ हजार लोकांवर करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून समोर आलं की, प्लाज्मा थेरपी काही चमत्कार करत नाही. अर्जेंटीनातील एका रिसर्चमधून हीच बाब समोर आली आहे. तेथील डॉक्टरांनुसार प्लाज्मा थेरपी प्रभावी नाही. गेल्याववर्षी ICMR ने सुद्धा रिसर्च केला होता की, ज्यातून समोर आलं होतं की, प्लाज्मा थेरपी मृत्यू दर कमी करण्यात आणि कोविडच्या गंभीर रूग्णांच्या उपचारासाठी फायदेशीर नाही.